Viral Video: अ‍ॅनिव्हर्सरीला बनवला 'मृतदेहाचा केक', चाकूने कापून लोकांमध्येही वाटला

Viral Video: अ‍ॅनिव्हर्सरीला बनवला 'मृतदेहाचा केक', चाकूने कापून लोकांमध्येही वाटला

एखाद्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला त्याच्या शरीराचा केक तयार करून कापल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का?

  • Share this:

माद्रिद (स्पेन) , 20 फेब्रुवारी : सध्या केकवर वाढदिवस असणाऱ्याचा फोटो छापण्याची स्टाईल आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या पुण्यतिथीला त्याच्या शरीराचा केक तयार करून कापल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? नसेलच ऐकलं पण असा प्रकार सत्यात घडला आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात बर्‍याच प्रथा एकमेकांपासून खूप भिन्न आहेत. काही प्रथा खूप जुन्या आहेत आणि काही लोक नवीन मार्ग निवडतात. असेच एक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण स्पेनचं असल्याचं सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की काही मुलं कसे केक खात आहेत.

मुलांनी व्यक्तीचा केक बनवून तो पुण्यतिथीला कापला. सगळ्यांना वाटला. फोटो काढले. पुण्यतिथीचं असं सेलिब्रेशन पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सगळी लहान मुलं केक खात आहेत आणि एक फोटोग्राफर त्या ठिकाणी फोटो क्लिक करत आहे. इतकंच नाही तर केक सगळ्यांना सर्व्ह करण्यासाठी वेटरही बोलावण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की - आता फक्त हेच पाहणं बाकी आहे.

खरंतर सुरुवातीला हा व्हिडिओ पाहून तुम्ही घाबराल. परंतु नीट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, हा एखाद्याचा मृतदेह नसून केक आहे. एखाद्या मेलेल्या माणसाला त्याच्या मृत्यूनंतर अशा प्रकारे श्रद्धांजली दिली गेली आणि त्याचा केक बनवला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: world news
First Published: Feb 20, 2020 01:27 PM IST

ताज्या बातम्या