आता तर हद्दच झाली! लॉकडाऊनमध्ये आळशी पती-पत्नीचा गजब जुगाड, VIDEO VIRAL

मेहनतीशिवाय काम पूर्ण करण्यासाठी ही आळशी माणसं नवनवे जुगाड करतात, ते या व्हिडीओतून दिसेल.

मेहनतीशिवाय काम पूर्ण करण्यासाठी ही आळशी माणसं नवनवे जुगाड करतात, ते या व्हिडीओतून दिसेल.

  • Share this:
    आता तर हद्दच झाली...कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून लोक घरातून काम करीत आहे. त्यामुळे अनेकांच्या आयुष्यात निवांतपणा आल्याचं दिसत आहे. यातही काही आळशी लोकांमधील आळस अधिक वाढल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आळस एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे माणूस काहीच कामाचा राहत नाही. आळशी माणसाचं मन कोणत्याच कामात लागत नाही. त्याला नेहमी असं वाटत असतं की त्याचं कोणतही काम मेहनतीशिवाय पूर्ण व्हावं. आळशी लोक या वृत्तीतून अनेक चित्र-विचित्र उपायही शोधत असतात, हे ही खरंच.. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि तुम्हाला हसूदेखील आवरणार नाही. आळशी लोक मेहनतीशिवाय काम करण्यासाठी काय काय उपाय शोधून काढतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओला त्यांनी मजेशीर कॅप्शनदेखील दिली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला आणि एक पुरुष दोन वेगवेगळ्या सोफ्यावर झोपून मोबाइल पाहत आहेत. दोन्ही सोफ्यांच्या कोपऱ्यावर एक टेबल फॅन सुरू आहे. त्याला रश्शी बांधून द्राक्षांचा गुच्छा लटकवण्यात आला आहे. टेबल फॅन स्विंग करीत प्रत्येक वेळी एका व्यक्ती जात आहे. त्यानुसार दोन्ही दिशेने महिला व पुरुष झोपले आहे. आणि प्रत्येक वेळी ते द्राक्ष खात आहेत. हे ही वाचा-पावसात हेलिकॉप्टर शॉट मारताना खेळाडूचं थेट जमिनीवर लँडिंग, VIDEO VIRAL लोकांनी हा व्हिडीओ पसंत केला आहे. अनेक जण यावर मजेशीर कमेंटही करीत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published: