कोरोना लस घेतली असेल तर मिळणार मोठी सूट; हॉटेल व्यावसायिकाने सुरू केली नवी ऑफर

कोरोना लस घेतली असेल तर मिळणार मोठी सूट; हॉटेल व्यावसायिकाने सुरू केली नवी ऑफर

कोरोना लशीबाबत (Corona Vaccine) अफवा पसरवली जात असताना अनेकजण आणि संस्था लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करीत आहे.

  • Share this:

दुबई, 26 जानेवारी : कोरोना लशीबाबत (Corona Vaccine) अफवा पसरवली जात असताना अनेकजण आणि संस्था लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करीत आहे. असाच एक अनोखा प्रकार दुबईतील रेस्तरॉमध्ये (Dubai restaurants) पाहायला मिळाला. या रेस्तरॉ मालकाने कोरोना लसीकरण करणाऱ्या व्यक्तीला खाण्याच्या पदार्थात मोठी सूट  (discounts to customers) देण्याची घोषणा केली आहे.

संयुक्त अरब आमिरात (United Arab Emirates) मधील एक कोटी लोकसंख्येतील एक चतृथांश म्हणजे तब्बल 25 हजार लोकांनी लस घेतली आहे. इस्त्राइलनंतर सर्वाधिक गतीने दुबईत लसीकरण करण्यात आलं आहे. गेट्स हॉस्पिटॅलिटीअंतर्गत सुरू असलेल्या दुबईतील तीन रेस्तरॉमध्ये सोशल मीडियावर लिहिलं आहे की, या रेस्तरॉमध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यास 20 टक्के आणि दुसरा डोस घेतल्यास 20 टक्के सवलत मिळेल.

हे ही वाचा-Delivery Boy कडून गुडांनी हिरावून घेतलं पार्सल; SWIGGY ने मेसेज करुन सांगितलं...

दुबईसह सात आमिरातीपासून मिळून तयार झालेल्या यूएईने डिसेंबरपासून व्यापर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू केला होता. यूएईने चिनी कंपनी सिनोफार्म, अमेरिकेतील औषध कंपनी फायजर आणि जर्मनीसोबत काम करणारी बायोनटेकच्या लशीच्या वापरासाठी हिरवा कंदील दिला आहे. दुबईतील हेल्थ एजन्सीचं म्हणणं आहे की, या आठवड्यात लसीकरण अभियानाची गती कमी करतील, कारण फायजरकडून सांगण्यात आलं आहे की, बेल्जिअमच्या त्यांच्या प्लांटमधून लस येण्यास वेळ लागू शकतो. तर सिनोफार्म लस सहजपणे उपलब्ध आहे. नवीन वर्षात कोरोना प्रकरणात वाढ होत असताना दुबईत पर्यटन, रेस्तरॉ आणि आणि विविध सेवा पूर्णपणे खुल्या आहेत. असं असलं तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 26, 2021, 8:12 PM IST

ताज्या बातम्या