मुंबई, 27 जानेवारी : मुक्या जीवांना त्रास देऊन मनोरंजन करणं हा तर माणसाचा स्वभावचं. मुक्या जीवांकडून वेगवेगळ्या कसरती करून घेणं, त्यातून मनोरंजन करणं आणि पैसे कमवणं असं कित्येक ठिकाणी होतं. त्या जीवांना बोलता येत नसलं तरी त्यांना तितक्याच वेदना होत असतात. पण म्हणतात करावं तसं भरावं. तसाच एक व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. ज्यामध्ये एका घोड्याला (Horse) त्याचा मालक नाचवत होता आणि मग त्या घोड्यानं मालकाला चांगलाच धडा शिकवला आहे.
सध्या सोशल मीडियावर एका नाचणाऱ्या घोड्याचा (Horse Dance) व्हिडीओ व्हायरल होतो आहे. आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये घोड्याला नाचायला लावणाऱ्या मालकाला घोड्यानंच चांगली अद्दल घडवली आहे.
व्हिडीओत पाहू शकता एका मैदानात एक घोडा मस्त डान्स करतो आहे. खरं तर त्याचा मालक त्याला नाचवतो आहे. मालक त्या घोड्याच्या शेजारीच उभा आहे. नाचता नाचता घोडा मालकाला लाथ मारतो. घोड्याचा पाय मालकाच्या पायावर पडतो आणि मग काय घोड्यासह मालकही उड्या मारू लागतो. मालकही घोड्यासोबत नाचू लागतो.
दीपांशू यांनी हा व्हिडीओ शेअर करताना पहिल्यांदा फक्त घोडा नाचत होता. पण घोड्याच्या एका छोट्याच्या रिक्वेस्टमुळे मालकही नाचू लागला, असं कॅफ्शन त्यांनी दिलं आहे. जणू आपल्यासोबत मालकानंही डान्स करावा अशी इच्छा घोड्याची इच्छा होती. पण तो बोलून हे मालकाला सांगू शकत नव्हता. मग त्यानं नाचता नाचता आपल्या मालकाला लाथ मारली. त्यानंतर मालकही नाचू लागला. हा व्हिडीओ पाहताच त्यावर अशाच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.