लॉकडाऊनमुळे ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा VIDEO

लॉकडाऊनमुळे ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा VIDEO

याच लॉकडाऊनदरम्यान हातवर पोट असणाऱ्यांचे मात्र मोठे हाल झाले आहेत.

  • Share this:

कोटा, 29 मार्च : कोरोनाचा देशभरात प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याच लॉकडाऊनदरम्यान हातवर पोट असणाऱ्यांचे मात्र मोठे हाल झाले आहेत. तर लॉकडाऊनमुळे अनेक भागांमध्ये धान्यही पोहोचलं नाही. कुन्हाडी पोलिस स्टेशन परिसरातील नांता भागात शनिवारी दुपारी काही लोक एकत्र आले आणि त्यांनी एका मिनी ट्रकवर दरोडा टाकला. लोकांनी या ट्रकमधील धान्य आणि पीठाची पोती पळवून नेली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता मोठ्या संख्ये लोक या मीनी ट्रकच्या मागे पीठीची पोती आणि धान्य लुटण्यासाठी कसे पळत आहेत. या मिनी ट्राकवर बजरंगपती मील असं लिहिलं आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप या मिनी ट्रक चालकानं गुन्हा दाखल केला की नाही याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. लॉकडाऊन असताना एवढी लोक रस्त्यावर आले कुठून पोलिसांचं लक्ष नव्हतं का? असे अनेक प्रश्न युझर्सनी उपस्थित केले आहेत. आधीच जीवनावश्यक वस्तुंचा अनेक भागांमध्ये लॉकडाऊनमुळे तुटवडा आहे आणि त्यात अशा घटनांमुळे मोठं नुकसान होत असल्याचं दिसत आहे. युझर्सनी अशा पद्धतीनं लूट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत कोणतीही अधिक माहिती मिळू शकली नाही.

हे वाचा-ट्विंकल खन्नाला Coronavirus ची लागण? बायकोसह हॉस्पिटलमध्ये पोहोचला अक्षय कुमार

हे वाचा-मुंबईत कोरोनामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू, राज्यातील मृतांचा आकडा 07

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2020 03:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading