VIDEO: आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी थेट सिंहाशी भिडली म्हैस; पुढे असं काही झालं...

VIDEO: आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी थेट सिंहाशी भिडली म्हैस; पुढे असं काही झालं...

एक म्हैस आपल्या धारदार शिंगांनी सिंहाला पळवण्याचा प्रयत्न करते. ती आपल्या साथीदारांना तर वाचवते, पण पुढे असं काही होतं, की....म्हैस आणि सिंहामध्ये जुंपलेला थरार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी माणसं ज्याप्रमाणे धडपडत असतात, त्याप्रमाणे प्राणीदेखील आपल्या जीवाची बाजी लावतात. जंगलात राहताना प्राण्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. अनेक प्राण्यांना हिंस्त्र प्राण्यांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचंही रक्षण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक म्हैस, आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी थेट जंगलाचा राजा सिंहाशीच भिडते.

म्हशींच्या एका कळपासमोर जंगलाचा राजा सिंह आल्यानंतर, त्यातील एक म्हैस आपल्या धारदार शिंगांनी सिंहाला पळवण्याचा प्रयत्न करते. ती आपल्या साथीदारांना तर वाचवते, पण पुढे असं काही होतं, की....म्हैस आणि सिंहामध्ये जुंपलेला थरार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एका मैदानात चार-पाच म्हशी चरण्यासाठी आल्याचं दिसतंय. त्यावेळी एक सिंह म्हशींवर हल्ला करण्यासाठी येतो. त्याचवेळी इतर म्हशी पुढे जातात, आणि एक म्हैस मात्र मागे राहते. ज्यावेळी सिंह म्हशींच्या कळपाजवळ पोहचतो, त्यावेळी मागे राहिलेली एक म्हैस सिंहावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, ती सिंहाला रोखण्यासाठी त्याच्याशी थेट भिडते. सिंहही म्हशीने अशाप्रकारे केलेल्या हल्ल्याने पुन्हा मागे वळतो.

(वाचा - VIDEO:पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहाशी भिडली आई; झेब्राच्या पिल्लाच्या सुटकेचा थरार)

काही वेळ म्हैस त्या सिंहाच्या मागे जात राहते. पण ज्यावेळी ती सिंहाच्या पुढे निघते, त्यावेळी मात्र सिंह, म्हशीवर उलट हल्ला करतो. म्हैस पळण्याचा प्रयत्न करते, पण सिंह तिच्या पाठीवर हल्ला करतो. म्हैस सिंहाला जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न करते, पण सिंह म्हशीचा जबडा इतक्या ताकदीने पकडून ठेवतो, की म्हशीला काहीच हालचाल करता येत नाही. म्हैस सिंहाला झटका देऊन पाडण्याचा प्रयत्न करते, पण सिंह म्हशीची मान, जबडा पकडून लटकूनच राहतो. काही वेळ दोघांमध्ये झटापट होते. सिंह म्हशीला जमिनीवर पाडतो आणि त्यानंतर मात्र म्हैस उठू शकत नाही.

(वाचा - तलावात पाणी पिण्यासाठी आलेल्या म्हशीवर मगरीचा हल्ला; पुढे जे झालं....पाहा VIDEO)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून @aiftiras नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: May 11, 2021, 10:30 PM IST

ताज्या बातम्या