उंदराची हिम्मत बघा! तब्बल 24 तास थांबवलं एअर इंडियाचं विमान

उंदराची हिम्मत बघा! तब्बल 24 तास थांबवलं एअर इंडियाचं विमान

एका उंदरामुळे एकाच जागेवर होते एअर इंडियाचे विमान, प्रवाशी हैराण झाले .

  • Share this:

वाराणसी, 28 जानेवारी : विमानाचे उड्डाण शक्यतो हवामानामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे रोखले जाते. मात्र कधी एका उंदरामुळं विमानाचे उड्डाण थांबल्याचे ऐकले आहे? नाही ना, मात्र वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री विमानतळावर नुकताच असा प्रकार घडला. या विमानतळावरून चक्क 24 तास विमान एका उंदरामुळे थांबले. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

वारासणीहून देहरादूनला रवाना होणारे विमान सकाळी उड्डाण करणार होते. मात्र विमानात उंदीर असल्याची अफवा परसली. त्यानंतर विमानातील सर्व स्टाफ फक्त उंदीर शोधत होते. तबब्ल 24 तास शोध घेतल्यानंतरही उंदीर सापडला नाही. अखेर सोमवारी सकाळी विमानाने देहरादूनला उड्डाण केले. यावेळी, प्रवाशांना विमानातून उतरून 24 तास हॉटेलमध्ये हलविण्यात आले आणि एअरलाइन्सचे कर्मचारी उंदीर शोधत राहिले.

वाचा-पोटात दुखायचं म्हणून मुलीला केलं अ‍ॅडमिट, किडनीपासून अन्ननलिकेपर्यंत सापडलं...

विमानचलन नियमांनुसार, उंदीर विमानात असताना कोणत्याही परिस्थितीत विमान उड्डाण करू शकत नाही. कारण उंदरामुळे विमानाच्या कोणत्याही वायरिंगचे नुकसान होऊ शकते. असे होणे फारच धोकादायक आहे. हे प्रवासी आणि विमानातील सर्व खलाशी सदस्यांसाठीही जीवघेणे ठरू शकते. शनिवारी रात्री आणि रविवारी एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांना एका उंदरामुळे दिवसभर उड्डाण थांबवावे लागले. यावेळी देखभाल कामगार विमानाच्या केबल्सची तपासणी करत राहिले आणि उंदीर शोधतही राहिले.

वाचा-विवाहित प्रेयसीला जिवंत जाळलं, तिचा 5 वर्षांचा मुलगाही आगीच्या ज्वालात होरपळला

विमान कंपनीकडे नव्हते उत्तर

विमान पुन्हा उड्डाण करण्यासाठी रॉडेंट फ्री (उंदीर-मुक्त) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वाराणसी विमानतळावरून उंदीर विमानात चढला होता की तो आधीच विमानात होता याबाबत एअरलाईन्सचे अधिकारी तपास घेत आहेत.

वाचा-कॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स! VIDEO VIRAL

कोलकाताहून 80 मिनिटांच्या विलंबाने विमानाने उड्डाण केले

वाराणसी विमानतळाचे संचालक आकाशदीप माथूर यांनी, रॉडेंट फ्री हे विमान घोषित करण्यासाठी आवश्यक तपास करण्यात आला आणि हे विमान सोमवारी सकाळी देहरादूनला रवाना झाले", असे सांगितले. हे विमान कोलकाताहून सायंकाळी 3 वाजून 55 मिनिटांनी उड्डाण करणार होते परंतु ते विमान 80 मिनिटांच्या विलंबाने सायंकाळी 5 वाजता वाराणसीला रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: air india
First Published: Jan 28, 2020 01:02 PM IST

ताज्या बातम्या