वाढदिवस (
Birthday) हा प्रत्येकाचा आवडीचा दिवस असतो आणि तो त्याच्यासाठी स्पेशलही असतो. या दिवशी अनेकदा आपण नवं काही करण्याचा संकल्प करत असतो. तसा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्नही करतो. आपल्यासाठी काही खरेदी करतो किंवा इतर कुणीतरी आपल्याला भेटवस्तू (
Gifts) देतं. वर्षातला हा दिवस संस्मरणीय प्रत्येकासाठी असतो. त्यात आपल्या वाढदिवशी दुसऱ्या कोणाचा वाढदिवस असेल, तर आपल्याला आणखी आनंद होतो. तीच जर आपल्या कुटुंबातील कोणी व्यक्ती असेल, तर घरात दुप्पट (
Double) उत्साहाचं वातावरण असतं. मात्र असं क्वचितच होतं की आपल्या घरातील दोन व्यक्तींचे वाढदिवस एकत्र येतात. पण एक असंही कुटुंब आहे, ज्यामधील तब्बल 9 सदस्यांचे वाढदिवस एकाच दिवशी येतात. (
Family of nine has same birthday) या खास गोष्टीमुळेच या कुटुंबाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानातील लरकाना भागात राहणाऱ्या अमीर आझाद मांगी यांच्या कुटुंबातील जवळपास सर्वांचाच जन्म एकाच दिवशी झाला आहे. (
Pakistani family same birthday) त्यांच्या कुटुंबात मांगी, त्यांची पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, हीच आधी सर्वांसाठी आश्चर्याची गोष्ट होती. या दोघांचा जन्म एक ऑगस्टला (
1 August) झाला होता. विशेष म्हणजे, मांगी यांचं लग्नही एक ऑगस्टलाच झालं होतं. त्याहून कहर म्हणजे, मांगी दाम्पत्याला झालेल्या सात मुलांचा जन्मदिवसही एकाच तारखेला झाला आहे. ती तारीख आहे एक ऑगस्ट. म्हणजेच, एक ऑगस्ट रोजी या कुटुंबात नऊ वाढदिवस आणि एक लग्नाचा वाढदिवस असे एकूण दहा वाढदिवस साजरे होतात. (
Family members same birthday)
हे वाचा-जगातली सगळ्यात फिट महिला टिया क्लेयर टूमी; ‘हे’ आहे तिचं फिटनेस Secret
मिळालेल्या माहितीनुसार, मांगी हे लरकाना भागात शिक्षक आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये सात मुलांचा समावेश आहे. यांपैकी चार मुलं जुळी आहेत. सिंधु, सुसई, आमिर, अम्मार, अहमर, सपना आणि अंबर अशी या सात मुलांची नावं आहेत. यांमधील दोन मुलं आणि दोन मुली जुळी आहेत.
हे वाचा-असं काय घडलं की सगळं गावच्या गाव झालं Underground ,पाहा PHOTO
या वैशिष्ट्यामुळे या कुटुंबाचं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. एकाच कुटुंबातील सर्वाधिक लोकांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, असा हा रेकॉर्ड आहे. (
Most family members born on the same day) यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला भारतातील एका कुटुंबाचा समावेश आहे. भारतातील या कुटुंबातील पाच सदस्यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो.