• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • चार मित्रांनी 100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात तब्बल 1 लाख रुपये भाडे

चार मित्रांनी 100 वर्षे जुन्या हवेचीचा केला कायापालट; आता एका रात्रीसाठी घेतात तब्बल 1 लाख रुपये भाडे

PHOTO Source : halalakanda.com

PHOTO Source : halalakanda.com

2012च्या डिसेंबरमध्ये हलाला कांडाच्या डागडुजीला सुरूवात झाली. हवेलीच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये बदल न करता, त्यांनी सुमारे चार वर्षांमध्ये या हवेलीचा कायापालट (Halala Kanda Before and after) केला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जुलै : जुना हवेली म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर कित्येक वेळा जीर्ण झालेली, जाळ्या-जळमटं लागलेली आणि ठिकठिकाणी झाडं उगवलेली अशी घरं येतात. बऱ्याच वेळा या हवेली कधीही कोसळतील अशा परिस्थितीत असतात. त्यामुळे लोक अशा हवेल्यांमध्ये राहण्यास तयार नसतात. मात्र श्रीलंकेमधील एका 100 वर्षे जुन्या हवेलीत राहण्यासाठी लोक चक्क एका रात्रीचे तब्बल एक लाख रुपये मोजण्यासाठीही तयार होतात. हलाला कांडा (Halala Kanda) असं या हवेलीचं नाव आहे. श्रीलंकेच्या वेलिगामा (Weligama City) शहरामध्ये ही हवेली आहे. हलाला कांडा ही हवेली एवढा आलिशान आहे, की या ठिकाणी राहण्यासाठी लोक लाखो रुपये मोजतात. श्रीलंकेतील एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हलाला कांडा (Halala Kanda history) ही हवेली 1912मध्ये एका श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी बांधली होती. इथिओपियन सम्राट हॅली सेलासी आणि ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर कीथ मिलर असे मोठे लोक या हवेलीमध्ये पूर्वी राहून गेले आहेत. मात्र, नंतरच्या काळात या हवेलीचीची स्थिती खराब झाली. VIDEO: ती एक चूक पडली महागात; बसवरुन धडाधड कोसळले प्रवासी ही हवेली एवढी जीर्ण झाली होती, की यामध्ये ठिकठिकाणी झाडं उगवली होती. मात्र, तरीही 2010 मध्ये इंटिरिअर डिझायनर डीन शार्प (Dean Sharpe) याने हा हवेली विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्याने व त्याच्या तीन मित्रांनी (Dean Sharpe and friends) मिळून सुमारे तीन कोटी रुपयांना (Halala Kanda price) ही हवेली, आणि याच्या आजूबाजूची दोन एकर जमीन विकत घेतली. डीनच्या या निर्णयामुळे तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला मूर्ख ठरवलं होतं. पडकी हवेली विकत घ्यायला एवढे पैसे मोजल्यामुळे त्याचं नुकसानच होईल असं लोक म्हणत. मात्र डीनच्या मनात पुढील योजना तयार होती. या हवेलीच्या रिनोवेशनसाठी (Halala Kanda renovation) त्याने रॉस लोगी नावाच्या आर्किटेक्टला पाचारण केले. 2012च्या डिसेंबरमध्ये हलाला कांडाच्या डागडुजीला सुरूवात झाली. हवेलीच्या मूळ स्ट्रक्चरमध्ये बदल न करता, त्यांनी सुमारे चार वर्षांमध्ये या हवेलीचा कायापालट (Halala Kanda Before and after) केला. झी न्यूज हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Live Video: पाण्याच्या बाटलीवरून तुफान राडा; महिलांसह 10 जणांनी ढाब्यात शिरून केली तोडफोड या हवेलीमध्ये पाच बेडरुम, पाच बाथरुम, एक किचन, कोर्टयार्ड, स्विमिंग पूल आहे. यासोबतच, आतमध्ये श्रीलंकेतील अँटीक गोष्टींनी सजावट केली आहे. यात हेक्झागोनल वूड टेबल (Hexagonal wood table), जुन्या काळातील बुद्धिबळ (antique chess) तसेच इतर आकर्षक गोष्टी आहेत. हलाला कांडामध्ये जास्तीत जास्त 12 लोक राहू शकतात. या ठिकाणी एक मॅनेजर, शेफ, दोन सर्व्हिस बॉय, दोन माळी आणि एक सुरक्षा रक्षक काम करतात. सध्या या ठिकाणी राहण्यासाठी एका रात्रीचे सुमारे एक लाख रुपये मोजावे लागतात.
  First published: