24 तासात 4000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू; 'या' देशात दफन करण्यासाठी मिळत नाहीये जागा

24 तासात 4000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू; 'या' देशात दफन करण्यासाठी मिळत नाहीये जागा

आतापर्यंत या देशात 3,37,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • Share this:

ब्राझील, 7 एप्रिल : ब्राझीलमध्ये (Brazil) कोरोना व्हायरसचं संकट (Coronavirus) दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. ब्राझीलमध्ये मंगळवारी 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 4,195 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत ब्राझीलमध्ये 3,37,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर (America) ब्राझीलमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी देशात कोरोनाचे 86,979 नवीन रुग्ण समोर आले आहेत. वेळीच यावर उपाययोजन केली नाही तर या महिन्यात 1 लाख ब्राझील नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या ड्यूक यूनिवर्सिटीचे प्रोफेसर आणि ब्राझीलियन डॉक्टर मिगुएल निकोलिस यांनी सांगितलं की, हे एका न्यूक्लियर रिएक्टरप्रमाणे आहे. ज्यात चैन रिएक्शनची सुरुवात झाली आहे आणि आता हे नियंत्रणाबाहेर गेलं आहे. ही परिस्थिती फुकुशिमाप्रमाणे आहे. परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की, मृतांना दफन करण्यासाठी जागा मिळणं कठीण झालं आहे.

हे ही वाचा-कोरोना महासाथीमुळे नाही झाली तपासणी; 27 वर्षीय महिलेचा दुर्देवी अंत

अद्यापही लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय नाही

ब्राझीलवर वाढत असलेल्या संकटानंतर देशाचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो (Jair Bolsonaro) महासाथ कमी करण्यासाठी लॉकडाउन लागू करण्याच्या विचार करीत नसल्याचं समोर आलं आहे. बोलसोनारो गेल्या आठवड्यात म्हणाले की, जगातील कोणत्या देशात कोरोनाच्या महासाथीमुळे लोक मरत नाहीत?

मृतांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता

ब्राझीलमधील आरोग्य नीती अध्ययन संस्थेचे कार्यकारी निर्देशक मिगुएल लागो म्हणाले की, अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करणे ही एक मोठी चूक होती. येत्या दिवसात मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, मेअर्स आणि गव्हनर्स यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम तयार करण्यापासून रोखलं जात आहे.

ऑक्सीजन पुरवठा आणि औषधं नसल्याने अनेकांचा मृत्यू

दक्षिण अमेरिकेतील देशात 90 टक्के आयसीयू बेड्स कोरोना रुग्णांमुळे भरले आहेत. वास्तवात शेकडो लोकांचा मृत्यू ऑक्सीजन आणि औषधांचं पुरवठा न झाल्यामुळे झाली आहे. आतापर्यंत देशातील केवळ 3 टक्के लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोज मिळू शकले आहेत. या कारणामुळे चिंता देखील वाढली आहे. धीम्या गतीने लसीकरण होत असल्याने परिस्थिती अधिक भीषण झाली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 7, 2021, 4:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या