हा धाडसीपणा नव्हे मूर्खपणा; ‘त्या’ व्हिडिओवर रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

हा धाडसीपणा नव्हे मूर्खपणा; ‘त्या’ व्हिडिओवर रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

काही दिवसांपूर्वी धावत्या रेल्वेच्या दारात Tiktok बनवणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला होता.

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झालेल्या एका व्हिडिओने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. Tiktok साठी व्हिडिओ बनवतात धावत्या रेल्वेत स्टंटबाजी करणारा तरुण जीव गमावता गमावता वाचला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनीही हात जोडलेत आणि असं करणं म्हणजे बहादुरी नव्हे तर मूर्खपणा असल्याचं त्यांनी म्हटलं.

हा तरुण एक्स्प्रेसच्या दारात उभा राहिला आणि स्टंट करत होता. अचानक त्याचा हात सुटला आणि तोल जाऊन तो रेल्वेखाली आला. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका क्षणाला वाटलं की हा तरुण गेलाच की काय मात्र दुसऱ्याच क्षणाला तो सुखरूप असल्याचं दिसताच सुटकेचा श्वास सुटतो. धावत्या रेल्वेत असे स्टंट वारंवार केले जातात आणि त्याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नागरिकांना सावध केलं आहे.

"चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करणं धाडसाची नाही, तर मूर्खपणाची निशाणी आहे. तुमचं जीवन अमूल्य आहे, त्याला धोक्यात टाकू नका. नियमांचं पालन करा आणि सुरक्षित यात्रेचा आनंद घ्या", असं ट्विट रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे.

हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही. या तरुणाचं नशीब बलवत्तर म्हणून सुदैवानं त्याचा जीव वाचला. मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही, त्यामुळे नागरिकांनो असं करू नका, असं आवाहन रेल्वे मंत्रालयाने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2020 05:15 PM IST

ताज्या बातम्या