गुगल वाय-फाय अ‍ॅप मेपासून बंद होणार; असा असेल नवा बदल

गुगल वाय-फाय अ‍ॅप मेपासून बंद होणार; असा असेल नवा बदल

एका ताज्या वृत्तानुसार, गुगल वाय-फाय अ‍ॅपद्वारे 25 मेपासून या क्रिया करता येणार नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 एप्रिल : गुगल वाय-फाय अ‍ॅपमधून (Google Wi-Fi App)स्मार्ट राउटर्सचं फंक्शन कंट्रोल काढून टाकण्याचं नियोजन गुगल करत आहे. पुढे जाऊन हे कंट्रोल्स गुगल होम(Google Home)अ‍ॅपवर दिले जाणार असल्याचं समजतं. 'इंडिया टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सध्याच्या गुगल वाय-फाय अ‍ॅपद्वारे गुगल वाय-फाय(Google Wi-Fi Router)आणि ऑन हब राउटर्सचं (OnHub Router)फंक्शन कंट्रोल कॉन्फिगर करता येतं. वाय-फाय चालू-बंद करणं, इंटरनेटचा स्पीड तपासणं, वाय-फायचा पासवर्ड दर्शवणं अशी विविध सेटिंग्ज अ‍ॅपद्वारे बदलता येतात. 'दीव्हर्ज'ने प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या वृत्तानुसार, गुगल वाय-फाय अ‍ॅपद्वारे 25 मेपासून या क्रिया करता येणार नाहीत.

याचाच अर्थ असा, की गुगल वायफाय किंवा ऑनहब राउटर असला, तरी त्यात गुगल वाय-फाय अ‍ॅपद्वारे बदल करणं 25 मेपासून शक्य होणार नाही. 25 मे नंतर या अ‍ॅपमध्ये केवळ नेटवर्क स्टेटस दर्शविलं जाईल. नंतर टप्प्याटप्प्याने गुगलकडून हे अ‍ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर (Google Play Store)आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधूनही (Apple App Store)काढलं जाईल.

गुगल वाय-फाय अ‍ॅपद्वारे करता येणारी सेटिंग्ज त्यानंतर गुगल होम या अ‍ॅपवर हस्तांतरित केली जाणार आहेत. गुगलने अधिकृत ब्लॉगमध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर, गुगल होम हे अ‍ॅप वापरणारे युझर्स त्यांचं गुगल वाय-फाय नेटवर्क या अ‍ॅपद्वारे नियंत्रित करू शकतात. सध्या अस्तित्वात असलेल्या गुगल वाय-फाय नेटवर्कमध्ये अ‍ॅडॉन पॉइंट म्हणून नेस्ट वाय-फाय राउटर अ‍ॅड करणं युझर्सना शक्य होईल.

वाय-फायडिव्हाइसेस रिनेम करणं, वाय-फाय डिव्हाइसची रूम बदलणं, नवं वाय-फायडिव्हाइस सेटअप करणं,नवे वाय-फाय मॅनेजर्स अ‍ॅड करणं किंवा असलेल्या मॅनेजर्समध्ये बदल करणं अशी सगळी कामं गुगल होम अ‍ॅपद्वारे करता येऊ शकतील.

या बदलामुळे पहिल्यांदाच गुगल वाय-फायला गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे वाय-फाय सेटिंग्ज बदलण्यासाठी युझर्स व्हॉइस कमांड्सचा वापर करू शकणार आहेत. त्यात वाय-फाय चालू-बंद करणं, इंटरनेटचा स्पीड (Internet Speed)तपासणं, वाय-फायचा पासवर्ड पाहणं अशा कामांचा समावेश आहे.

युझर्स जेव्हा गुगल होम अ‍ॅपमध्ये गुगल वाय-फाय डिव्हाइसेस आणि सेटिंग्ज अ‍ॅड करतील तेव्हा सध्या गुगल वाय-फाय अ‍ॅपमध्ये असलेले मॅनेजर्स काढून टाकण्यात येतील,असंही सांगण्यात आलं आहे.

युझर्सना गुगल होम अ‍ॅप होम मेंबर्स म्हणून इतरांना अ‍ॅड करावं लागेल. त्यानंतर त्यांना वाय-फाय आणि डिव्हाइस सेटिंग्जचा अ‍ॅक्सेस मिळू शकेल.

First published: April 7, 2021, 6:48 PM IST
Tags: Google

ताज्या बातम्या