
पण हा मेसेज खोटा असून अनेक लोक याला बळी पडले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार को-विन आणि आरोग्य सेतू या दोन पर्यायांशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकत नाही. हे वाचा - अनोख्या मायक्रोचिपचा शोध, रक्तातून फिल्टर करुन बाहेर काढणार कोरोना विषाणू व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या या मेसेजमधील दावा खोटा असल्याचे प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau )सांगितले असून, भारत सरकारने या व्हॉट्सअॅप फॉरवर्ड मेसेजच्या बाबतीत जनतेला सतर्क केलं आहे. पीआयबीने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे,की कोरोना लसीकरणाची नोंदणी केवळ को-विन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपद्वारेच करता येईल. कोणीही व्हॉट्सअॅपवरून तुम्हाला लसीकरणाच्या नोंदणीबद्दल सांगत असेल तर अशा लोकांपासून सावध रहा,ते तुम्हाला फसवू शकतात, असा सल्लादेखील पीआयबीने दिलाआहे. हे वाचा - नियम धाब्यावर, परवानगी नसताना कोविड रुग्ण दाखल, बीएएमस डॉक्टरांकडून उपचार नागरिकांना को-विन पोर्टलच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी करण्यास केंद्र सरकारने सांगितलं आहे. या पोर्टलवर आरोग्य सेतूच्या माध्यमातूनही जाता येतं. सरकार सध्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देत आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त मात्र गंभीर आजार असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. तर आता 45 वर्षांपेक्षा जास्त सर्वांना कोरोना लस दिली जात आहे.An image claiming that COVID-19 #Vaccination appointment can be booked through #WhatsApp is circulating on social media. #PIBFactCheck: This claim is #Fake.
Registration for #COVID19 vaccination can be done only through the COWIN portal and Arogya Setu app. pic.twitter.com/HmqvpraDlo — PIB Fact Check (@PIBFactCheck) April 12, 2021