आऊट का नॉट आऊट? तुम्हीच सांगा, क्रिकेट सामन्यातला विचित्र VIDEO
क्रिकेटच्या नियमांवरून अनेकवेळा गोंधळ झाल्याचं आपण ऐकतो. 2019 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (World Cup Final 2019) इंग्लंडला बाऊंड्री काऊंटच्या नियमांमुळे विजयी घोषित करण्यात आलं होतं, त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा क्रिकेटचे नियम चर्चेत आले आहेत. याचं कारण ठरलं आहे बांगलादेश आणि झिम्बाब्वे (Zimbabwe vs Bangladesh) यांच्यातली दुसरी वनडे.

मुंबई, 19 जुलै : क्रिकेटच्या नियमांवरून अनेकवेळा गोंधळ झाल्याचं आपण ऐकतो. 2019 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (World Cup Final 2019) इंग्लंडला बाऊंड्री काऊंटच्या नियमांमुळे विजयी घोषित करण्यात आलं होतं, त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा क्रिकेटचे नियम चर्चेत आले आहेत. याचं कारण ठरलं आहे बांगलादेश आणि झिम्बाब्वे (Zimbabwe vs Bangladesh) यांच्यातली दुसरी वनडे. झिम्बाब्वेचा कर्णधार ब्रॅण्डन टेलर (Brendon Taylor) याला विचित्र पद्धतीने आऊट देण्यात आलं. यानंतर सोशल मीडियावर टेलर नक्की आऊट होता का नव्हता, याविषयी चर्चा सुरू झाली.
पहिल्या इनिंगमध्ये 25 वी ओव्हर सुरू असताना हा प्रकार घडला. शोरीफूल इस्लामच्या बॉलिंगवर टेलर अप्पर कट मारण्यासाठी गेला, पण त्याच्या बॅटला बॉल लागला नाही, त्यामुळे बॉल विकेट कीपरच्या हातात गेला. यानंतर टेलर खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूला जात होता, पण त्याची बॅट स्टम्पला लागली आणि बेल्स उडाल्या. क्रिकेटच्या नियमांनुसार अंपायरने त्याला आऊट दिलं.
2019 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश आणि वेस्ट इंडिज (Bangladesh vs West Indies) यांच्यातल्या सामन्यात ओशेन थॉमस (Oshane Thomas) याच्या सोबतही असाच प्रकार घडला होता, पण त्याला नॉट आऊट देण्यात आलं.
ब्रॅण्डन टेलर या सामन्यात 46 रन करून आऊट झाला. झिम्बाब्वेने दिलेलं 240 रनचं आव्हान बांगलादेशने 49.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या विजयासह बांगलादेशने 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. त्याआधी बांगलादेशने दौऱ्यातल्या एकमेव टेस्टमध्येही 220 रनने विजय मिळवला होता.
Published by:Shreyas
First published:
आऊट का नॉट आऊट? तुम्हीच सांगा, क्रिकेट सामन्यातला विचित्र VIDEO