WTC Final : विराटने मैदानात उतरताच केला विक्रम, धोनीला टाकलं मागे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरला तेव्हा त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही 61 वी टेस्ट आहे, याचसोबत त्याने एमएस धोनीला (MS Dhoni) मागे टाकलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरला तेव्हा त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही 61 वी टेस्ट आहे, याचसोबत त्याने एमएस धोनीला (MS Dhoni) मागे टाकलं आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 19 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानात उतरला तेव्हा त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही 61 वी टेस्ट आहे, याचसोबत त्याने एमएस धोनीला (MS Dhoni) मागे टाकलं आहे. धोनीने 60 टेस्टमध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं. यातल्या 27 टेस्टमध्ये भारताचा विजय झाला, तर 18 टेस्टमध्ये पराभव आणि 15 मॅच ड्रॉ झाल्या. विराट कोहली हा आता भारताचा सर्वाधिक टेस्टमध्ये नेतृत्व करणारा कर्णधार बनला आहे. विराट कोहली टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक 36 टेस्ट जिंकल्या, तर 10 टेस्टमध्ये पराभव झाला आणि 10 सामने ड्रॉ झाले. विराटच्या नेतृत्वात भारताने 59 टक्के सामने जिंकले. धोनी कॅप्टन असताना भारताने 45 टक्के मॅच जिंकल्या. सौरव गांगुली (Sourav Ganguly) भारताच्या सगळ्यात यशस्वी कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने 49 टेस्टमध्ये कॅप्टन्सी केली, यात 12 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला तर 13 सामने हरले आणि 15 मॅच ड्रॉ झाल्या. चौथ्या क्रमांकावर मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) आहे. अझरने 47 टेस्टमध्ये 14 सामने जिंकले आणि तेवढेच गमावलेही. अझरच्या कॅप्टन्सीमध्ये 19 टेस्ट ड्रॉ झाल्या. सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी 47 टेस्टमध्ये भारताचं नेतृत्वं केलं. विराटच्या नेतृत्वात आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा विराट कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असला, तरी त्याच्या नेतृत्वात भारताला अजूनपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये हे रेकॉर्ड पुसून टाकण्याची संधी आहे. टीम इंडियाने मागची आयसीसी स्पर्धा 2013 साली जिंकली होती. एमएस धोनी कर्णधार असताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारताचा पराभवाचा सिलसिला सुरू झाला. 2014 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेने भारताचा पराभव केला, यानंतर 2015 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताला मात दिली. 2016 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलला वेस्ट इंडिजने भारताला पराभूत केलं. या तिन्ही वेळी धोनी भारताचा कर्णधार होता. तर 2019 साली वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताला हरवलं, तेव्हा विराट कॅप्टन होता. पॉण्टिंगचं रेकॉर्ड मोडण्याची संधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये कोहलीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचं (Ricky Poining) रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून रिकी पॉण्टिंगने सर्वाधिक 41 आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत. विराटच्या नावावरही एवढीच शतकं आहेत. त्यामुळे या सामन्यात शतक केलं तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा कर्णधार ठरेल. विराटचं शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालं होतं. कोलकात्यामध्ये झालेल्या डे-नाईट सामन्यात विराटने 136 रनची खेळी केली होती. यानंतर मात्र विराटला एकही शतक करता आलेलं नाही. तेव्हापासून विराटने 39 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
    Published by:Shreyas
    First published: