‘Mother from another Brother...’, 'या' पाकिस्तानी खेळाडूच्या ट्वीटमुळे MEMES चा पाऊस

‘Mother from another Brother...’, 'या' पाकिस्तानी खेळाडूच्या ट्वीटमुळे MEMES चा पाऊस

पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या इंग्रजीच्या चुकीच्या वापरासाठी अनेकदा ट्रोल होतात. पण सध्या या सगळ्या ट्रोलिंगचे रेकॉर्ड ब्रेक करत पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या इंग्रजीच्या चुकीच्या वापरासाठी अनेकदा ट्रोल होतात. पण सध्या या सगळ्या ट्रोलिंगचे रेकॉर्ड ब्रेक करत पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमलला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकबरोबरच्या पोस्ट केलेल्या एका फोटोच्या कॅप्शनवरून अकमल ट्रोलर्सची शिकार बनला आहे. त्याने या फोटोलो ‘Mother from another Brother’ अशी कॅप्शन देत रझाकबरोबरचा फोटो शेअर केला. त्यानंतर अकमलने जरी फोटो ट्विटपवरून डिलीट केला असला तरी त्याचे स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल झाले आहेत. एवढच नाही ‘#UmarAkmalQuote’ हा हॅशटॅग वापरत अनेकांनी आपल्या क्रिएटिव्हीटीला चालना दिली आहे. शेकडो memes सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अनेकांनी अकमलच्या ट्विटचा वापर करत स्वत:चं असं वर्जन बनवलं आहे.

कुणी "If being crime is handsome then arrest me" असं म्हटलं आहे, तर ‘’Sheet of future cannot decide your paper’’ असं म्हणत अकमलला ट्रोल केलं आहे. त्यावर येणाऱ्या कमेंट्सही भन्नाट आहेत.

अन्य बातम्या

हार्दिक पांड्या फिट झाला नाही तर, मुंबई इंडियन्सकडे असणार ‘हे’ 5 पर्याय

नवदीप सैनीने शेअर केला फोटो, पॉर्न स्टारच्या नावाने टीम इंडिया ट्रोल

ठाण्यात धोनीला लोकांच्या गर्दीतून वाचवलं, हेअरस्टायलिस्ट बनली बॉडीगार्ड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2020 01:20 PM IST

ताज्या बातम्या