VIDEO : कॅप्टन कोहलीच्या स्टंटने फॅन्स हैराण, पाहा विराटने नेमकं काय केलं!

VIDEO : कॅप्टन कोहलीच्या स्टंटने फॅन्स हैराण, पाहा विराटने नेमकं काय केलं!

विराटचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

  • Share this:

ऑकलँड 28 जानेवारी : टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपलं वर्चस्व गाजवत असल्याचं चित्र दिसत आहे. रनमशिन विराट कोहली आणि टीम सध्या आगामी सामन्यांसाठी आणखी मेहनत घेत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण विराटचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओनं फॅन्सच्या भुवया उंचावल्या आहेत.

विराटनं जीममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये विराट उंच उडी मारताना दिसत आहे. जागेवर बसलेला विराट उडी घेऊन रचलेल्या दोन बॉक्सवर उडी घेतानाचा हा व्हिडिओ फॅन्सच्याही पसंतीस उतरला आहे. #Keeppushingyourself म्हणत विराटनं हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर अपलोड केला आहे.

कोहली अनेकदा चौकारांपेक्षा धावा काढून धावसंख्या उभारण्यावर जोर देतो. म्हणूनच की काय, कोहलीची फलंदाजी अनेकांच्या पसंतीस उतरते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर विराटनं कामगिरी उंचावण्यावर भर दिला आहे. यासाठी सरावासोबत योग्य आहार आणि वर्कआऊटवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं विराटनं सांगितलं. विश्वातील सर्वात फिट खेळाडूंमध्ये विराटचंही नाव घेतलं जातं. काही वर्षांपूर्वी विराटनं मांसाहार सोडून शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. आता विराटनं हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारात केला आहे. प्रोटीन शेक, सोया आणि भाज्या असा आहार विराट घेत असल्याचं सांगितलं जातं. शाकाहारी पदार्थांमुळे परफॉर्मन्समध्ये चांगली सुधारणा झाल्याचंही विराट सांगतो.

याआधीही अनेक खेळाडूंनी मांसाहार सोडला आहे. यामध्ये टेनिस स्टार वीनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स, फुटबॉलपटू लियोनल मेसी तसेच, फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हैमिल्टन यांनी मांसाहार सोडला आहे. सध्या विराटच्या वर्कआऊट व्हिडिओला फॅन्सकडून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 02:01 PM IST

ताज्या बातम्या