कसोटीत झिम्बाब्वेला हरवल्यानंतर पाकिस्तान संघानं केलं असं काम, रसिकांची मनं जिंकली

कसोटीत झिम्बाब्वेला हरवल्यानंतर पाकिस्तान संघानं केलं असं काम, रसिकांची मनं जिंकली

Cricket News: दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघानं आता लोकांचं मनही जिंकलं.

  • Share this:

झीम वि पीएके, 12 मे: पाकिस्तान आणि झिम्बाब्वे (Pak vs Zim) दरम्यानच्या दोन्ही कसोटींमध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेला नमवून मालिका 2-० ने जिंकली. दुसर्‍या कसोटी सामन्यात डाव आणि 147 धावांनी विजय मिळवत पाकिस्ताननं मालिकेत शानदार कामगिरी केली. पाकिस्तानने दोन्ही कसोटी सामन्यांत झिम्बाब्वेचा दणदणीत पराभव केला. पण, अशी एक गोष्ट पाकिस्तानी क्रिकेट संघाने (Pakistani Cricket Team) केली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघानं आता लोकांचं मनही जिंकलं. कसोटी मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघ जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंनी हॉटेल कर्मचार्‍यांना आपल्या क्रिकेट संघाची जर्सी आणि भेटवस्तूही दिल्या.

पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) हॉटेल कर्मचार्‍यांच्या हातात हात मिळवत टी-शर्ट आणि इतरही भेटवस्तू दिल्या. हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो पाहून क्रिकेट चाहते पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या या कृतीला सलाम करत आहेत. यासह पाकिस्तानी कर्णधार बाबरनेही आपल्या नावावर एक विशेष विक्रम नोंदविला आहे.

हे वाचा - ‘आम्ही पाठीशी आहोत तू देशाचा पंतप्रधान हो’; चाहत्यांच्या इच्छेवर सोनू सूद म्हणाला

झिम्बाब्वेविरुद्ध दोन्ही कसोटी सामने जिंकून आझम चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग सामने जिंकणारा पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी कोणताही पाकिस्तान कर्णधारानं असा विक्रम करू शकलेला नाही.

हे वाचा - निवडणुका संपल्या की इंधन दरवाढ ठरलेलीच, वाढत्या किंमतीवरून जयंत पाटलांचा अर्थमंत्र्यांना टोला

बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्याचबरोबर आता झिम्बाब्वेविरुद्ध दोन्ही कसोटी सामने जिंकूनही विक्रम नोंदवला. बाबरची आयसीसीतर्फे एप्रिल महिन्यातील प्लेअर ऑफ दि मंथ म्हणून निवड झाली आहे. बाबर हा आयसीसीचा प्लेअर ऑफ द मंथचा किताब जिंकणारा जगातील पहिला कर्णधारही ठरला आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 2:44 PM IST

ताज्या बातम्या