हद्द झाली राव! गल्लीतला बॉलर यापेक्षा वेगानं बॉल टाकतो, VIDEO

हद्द झाली राव! गल्लीतला बॉलर यापेक्षा वेगानं बॉल टाकतो, VIDEO

टी-20 क्रिकेटच्या या जमान्यात बॉलरना विकेट घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागत आहेत. क्रिकेटचे बहुतेक नियम बॅट्समनच्या बाजूचे असल्यामुळे बॉलर रन रोखण्यासाठी नव्या आयडिया शोधून काढतात.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल : टी-20 क्रिकेटच्या या जमान्यात बॉलरना विकेट घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागत आहेत. क्रिकेटचे बहुतेक नियम बॅट्समनच्या बाजूचे असल्यामुळे बॉलर रन रोखण्यासाठी नव्या आयडिया शोधून काढतात. मग स्पिन बॉलर फास्ट बॉल टाकतात तर फास्ट बॉलर स्लो बॉलचा वापर करून बॅट्समनला चकवा देतात. फास्ट बॉलरकडून टाकण्यात येणारे स्लो बॉल आपल्याला सर्रास बघायला मिळतात. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (New Zealand Vs Australia) यांच्या महिला टीममध्ये झालेल्या सामन्यात असाच एक भन्नाट प्रयोग पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या लिघ कासपेरेकने (Leigh Kasperek) तिच्या स्लो बॉलिंगने अनेकांना धक्का दिला.

कासपेरेकने क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात स्लो बॉल टाकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कासपेरेकने टाकलेल्या बॉलचा वेग होता ताशी 38 किमी. न्यूझीलंडची स्पिनर असलेल्या कासपेरेकनं 8व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला एवढा स्लो बॉल टाकला. कासपेरेकनं टाकलेला या बॉलमुळे मुनीला चकवलं नाही, तर तिला बॉलपर्यंत पोहोचावं लागलं. कासपेरेकच्या या बॉलवर मुनीने लॉन्ग ऑफच्या दिशेने एक रन काढली.

माऊंट मांगनुईमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 21 रनने विजय झाला. वनडे क्रिकेटमधला ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमचा हा लागोपाठ 24वा विजय आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने तीन वनडे मॅचची ही सीरिज 3-0 ने जिंकली. पावसामुळे ही मॅच 25-25 ओव्हरची करण्यात आली होती. न्यूझीलंडने पहिले बॅटिंगला बोलावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 149 रन केले. एलिसा हिलीने 46 आणि मुनीने 28 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून कासपेरेकने 3 आणि ली ताहूहूने 2 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 25 ओव्हरमध्ये 128 रनच करता आले. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या तुहूहूने सर्वाधिक 21 रन केले. ऑस्ट्रेलियाकडून मेगान शट आणि जॉर्जिया वारेहामने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

Published by: Shreyas
First published: April 11, 2021, 3:49 PM IST

ताज्या बातम्या