IPLचे संघ आता जग जिंकणार! गांगुलीनं तयार केला मास्टरप्लॅन

IPLमध्ये होणार मोठा बदल, भारताबाहेर होणार सामने?

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : आयपीएल ही सध्या क्रिकेटमधली सर्वात मोठी लीग स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेचे आतापर्यंत 12 हंगाम खेळवण्यात आले आहे. तर, 13व्या हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. याआधी आयपीएलमध्ये आठही संघांनी आपल्या खेळाडूंना ट्रान्सफर विंडोमार्फत खेळाडूंची अदला-बदली केली. त्यामुळं आता लिलावात कोणत्या खेळाडूंना किती रक्कम मिळते ते पाहावे लागणार आहे. दरम्यान आता आयपीएलबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सौरव गांगुली यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. याआधी सौरव गांगुलीनं भारतात पहिल्यांदाच डे-नाईट सामन्याचे आयोजन केले. भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली. दरम्यान आता गांगुली जगातली सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएलचा प्रसार करण्यासाठी जगभरात संघाचे सामने खेळले जाणार आहेत. याआधी मुंबई इंडियन्स संघानं हा प्रस्ताव मांडला होता. यात खेळाडूंना मुख्य सामन्याआधी परदेशात सराव सामने खेळण्याची परवानगी मागितली होती. यावर आता गांगुलीनं मोठे संकेत दिले आहेत.

वाचा-World Record: असा डेब्यू होणे नाही; एकही धाव न देत घेतल्या 6 विकेट!

परदेशात सराव सामने खेळण्यासाठी करणार प्रयत्न

वास्तविक, बीसीसीआयच्या मुंबईतील 88 व्या एजीएममध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यात आयपीएलमधील संघांना या खेळाचा भारताबाहेर प्रसार करण्यासाठी मैत्रीपूर्ण सामने खेळायचे आहेत, यावर विशेष चर्चा केली. आता सौरव गांगुलीने याबद्दल सकारात्मक संकेत दिले आहेत. गेल्या महिन्यात असे वृत्त आले होते की आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी भारताबाहेर सराव सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान या निर्णयाला बीसीसीआयच्या एजीएममध्ये गांगुलीने ग्रीन सिग्नल दिले होते, परंतु रॉयल्टी म्हणून मंडळाला किती पैसे द्यावे लागणार याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे.

वाचा-क्रिकेटच्या मैदानात फलंदाज झाला धावपटू! 21 किमी धावत केला रेकॉर्ड

असा आहे हेतू

इंडियन प्रीमियर लीग संघांचे भारताबाहेरील इतर देशांमध्ये सामने खेळण्याचे उद्दीष्ट म्हणजे या लीगची भारताबाहेर जाहिरात करणे आणि खेळाडूंना त्यांच्या चाहत्यांशी थेट जोडणे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयपीएल गव्हर्निंग कॉन्सिलच्या बैठकीचा हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

वाचा-World Cup 2020 : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणार मुंबईचे 3 हुकुमी एक्के!

आयपीएल हॉल ऑफ फेम

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आणखी एक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, "इंडियन प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूंनी असाधारण कामगिरी केली आहे त्यांना आयपीएल हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्याची तयारी सुरू आहे". इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक चार विजेतेपद मिळवण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर आहे. त्यांच्यानंतर महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपरकिंग्जने तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 07:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading