T20 World Cup 2020 : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित! 'या' 11 खेळाडूंची जागा पक्की

T20 World Cup 2020 : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित! 'या' 11 खेळाडूंची जागा पक्की

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यासाठी सर्वच संघ आतापासून जय्यत तयारी करत आहेत.

  • Share this:

हॅमिल्टन, 28 जानेवारी : ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. यासाठी सर्वच संघ आतापासून जय्यत तयारी करत आहेत. त्यामुळं भारतीय संघाने देखील संघ बांधणीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. म्हणूनच भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या टी-20 मालिकेसाठी युवा खेळाडूंवर जास्त भर दिला आहे.

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर शानदार प्रदर्शन करत आहेत. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत विराटसेनेनं आतापर्यंत दोन टी-20 सामन्यात बाजी मारली आहे. आता तिसरा सामना हॅमिल्टन येथे 29 जानेवारीला खेळला जाईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0ने आघाडी घेतली आहे. मुख्य म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील खेळपट्टी आणि वातावरण एकसारखे आहे. त्यामुळं येथील अनुभवाचा खेळाडूंना नक्की फायदा होईल. दरम्यान, टी-20 वर्ल्ड कपसाठी या मालिकेतूनच भारतीय संघ मिळेल, असे संकेत टीम इंजियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिले आहे.

वाचा-‘पंत बडबड करतो आणि राहुल करून दाखवतो’, दिग्गज क्रिकेटपटूने केली ऋषभची मस्करी

भारताला मिळाला वर्ल्ड कप संघ!

भारत-न्यूझीलंड यांच्यात 28 जानेवारीला हॅमिल्टन येथे तिसरा टी-20 सामना होणार आहे. या सामन्याआधी राठोड यांनी, “संघात प्रयोग हे शेवटच्या मिनिटापर्यंत केले जातील मात्र आपला विश्वास आहे की वर्ल्ड कपचा संघ आम्हाला मिळाला आहे. संघ कसा असेल याबाबत आम्हाला माहिती आहे. फक्त दुखापतींची चिंता आम्हाला आहे”, असे सांगितले.

युवा खेळाडूंवर जास्त भर

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय संघाने वेगवेगळे प्रयोग केले आहे. यात जास्तीज जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यात आल्या आहेत. श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर आणि शिवम दुबे यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोनेही केले आहे. त्यामुळं वर्ल्ड कप संघ निवडताना या खेळाडूंना प्राधान्य दिले जाऊ शकते. दुसरीकडे न्यूझीलंड दौऱ्यात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे.

वाचा-यष्टीरक्षक केएल राहुलने रचला इतिहास, धोनी-पंतला टाकलं मागे

राहुलमुळे पंतची जागा धोक्यात

केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, फक्त फलंदाजी नाही तर यष्टीरक्षक म्हणूनही तो चांगली कामगिरी करत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत पंतच्या डोक्याला चेंडू लागल्यामुळं तो जखमी झाला होता, त्यामुळं न्यूझीलंड दौऱ्याला त्याला मुकावे लागले. त्यामुळं राहुल सध्या संघात यष्टीरक्षकाची भुमिका पार पाडत आहे. फलंदाजीबरोबरच केएलची यष्टीरक्षक म्हणूनही कामगिरी चांगली राहिली आहे. गेल्या 5 पैकी 4 टी-20 सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळं राहुलचा फॉर्म असाच राहिला तर वर्ल्ड कप संघातही पंतच्या जागी राहुलकडे विकेटकिपींगची जबाबदारी असेल. त्यामुळं धवनची जागाही धोक्यात आली आहे.

वाचा-...आणि श्रेयस अय्यर म्हणाला मराठीत सांगू का?, VIDEO VIRAL

असा असू शकतो टीम इंडियाचा वर्ल्ड कप संघ

शिखर धवन जखमी असल्यामुळं सध्या केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरत आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर विराटची जागा निश्चित आहे. सुरुवातीपासूनच चौथ्या क्रमांकावर कोण उतरणार यावरून अनेकदा विविध प्रयोग करण्यात आले, मात्र श्रेयस अय्यरचा फॉर्म पाहता चौथ्या क्रमांकावर अय्यर फलंदाजीसाठी उतरू शकतो. त्याशिवाय अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या किंवा शिवम दुबे यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. तर जडेजाचे स्थान जवळ जवळ पक्के आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये कुलदीप किंवा चहल यांना जागा मिळेल. तर जलद गोलंदाजांमध्ये भारताकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वाशिंग्ट सुंदर असे 5 पर्याय आहेत.

First published: January 28, 2020, 1:53 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading