India vs West Indies : विजयानंतरही युवीनं विराटसेनेला घेतले फैलावर, BCCIलाही सुनावले खडेबोल

India vs West Indies : विजयानंतरही युवीनं विराटसेनेला घेतले फैलावर, BCCIलाही सुनावले खडेबोल

भारतीय खेळाडूंची सुमार कामगिरी. या हॅट्रिकमुळे गमवावा लागू शकतो सामना.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. या सामन्यात विडींजच्या फलंदाजांनी 20 ओव्हरमध्ये 207 धावा केल्या. यात हेटमायरनं 56 धावांची तर पोलार्डनं 37 धावांची वादळी खेळी केली. भारतीय गोलंदाजांना मात्र या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. यात दीपक चहर सर्वात महागडा खेळाडू ठरला.

पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या ओव्हरपासून विडींजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची शाळा घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपक चाहरनं सिमन्सला बाद केले. मात्र त्यानंतर विडींजनं आक्रमक फलंदाजी करण्यात सुरुवात केली. ईव‍िन लुईस आणि ब्रेंडन क‍िंग यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांच्या 62 धावांच्या भागिदारीच्या जोरावर चांगली धावसंख्या उभारून दिली. ईव‍िन लुईसनं 40 धावा केल्या. हेटमायरनं आपले अर्धशतकही पूर्ण केले, त्यानंतर 56 धावांवर चहलनं त्याला बाद केले. पोलार्डनं 19 चेंडूत 37 धावांची आतषबाजी खेळी केली.

वाचा-गोलंदाजांचा सुपर फ्लॉप शो! भारताला 208 धावांचे आव्हान

मात्र खरा खेळा बदलला तो 17व्या ओव्हरमध्ये. दीपक चाहरच्या या ओव्हरमध्ये अनेक नाट्यमय प्रकार घडल्या. याआधी टीम इंडियानं एक-दोन कॅच सोडल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये भारताची लाजीरवाणी हॅट्रिक झाली. 17ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरनं हेटमायरचा कॅच सोडला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर रोहितनं सीमारेषेजवळ पोलार्डचा तर, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा रोहितनं पोलार्डचा कॅच सोडला. अखेर 18व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हेटमायर बाद झाला. भारताच्या युवा खेळाडूंच्या सुमार कामगिरीवर युवराज सिंगनं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.

वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी संपणार धवनचं करिअर? दिग्गज फलंदाजानं दिले संकेत

युवराज सिंगनं सोशल मीडियावर, युवा खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीच्या मागे नक्की काय कारण आहे? जास्त क्रिकटे खेळणे भारताला कठिण जात आहे, असेही युवी म्हणाला.

वाचा-चहलनं इन्स्टाग्रामवर टाकला फोटो अन् इंग्लंडची हॉट क्रिकेटपटू झाली ‘बोल्ड’!

दरम्यान या सामन्यात श्रीलंकेनंतर भारतीय भुमीवर केलेली ही सर्वात जास्त धावसंख्या आहे. याआधी श्रीलंकेनं 215 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता श्रीलंकेनं 207 धावा केल्या. तर, या सामन्यात एकूण 15 षटकार मारले गेले. भारतानं 2009मध्ये मोहालीमध्ये 207 धावांचे आव्हान पार केले होते. त्यामुळं हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 09:06 PM IST

ताज्या बातम्या