टी-20 वर्ल्ड कपआधी संपणार धवनचं करिअर? दिग्गज फलंदाजानं दिले संकेत

टी-20 वर्ल्ड कपआधी संपणार धवनचं करिअर? दिग्गज फलंदाजानं दिले संकेत

हा फलंदाज घेणार शिखर धवनची जागा, टी-20मधून घेणार निवृत्ती?

  • Share this:

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात झाली. ही मालिका पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी महत्त्वाची असणार आहे. मात्र या मालिकेतून शिखर धवनला माघार घ्यावी लागली. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दुखापत झाल्यामुळं धवननं या मालिकेतून माघार घेतली. त्यामुळं आता या मालिकेत सलामीवीर म्हणून केएल राहुलची जागा जवळ जवळ निश्चित झाली आहे.

वेस्ट इंडिजआधी झालेल्या बांगलादेश दौऱ्यात पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात धवननं धिमी फलंदाजी केली, त्यामुळं त्यावर टीका करण्यात आली होती. भारतानं बांगलादेशविरुद्ध मालिका जिंकली असली तरी, पहिला पराभव हा जिव्हारी लागणारा होता. त्यानंतरच्या सामन्यातही धवनला विशेष चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळं भारतीय संघाचे ज्येष्ठ सलामीवीर श्रीकांत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा-IPLमध्ये ज्या संघानं दाखवला बाहेरचा रस्ता, त्याच संघाचा मालक होणार गंभीर!

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्रीकांत यांनी आता केएल राहुलला रोहित शर्मासह सलामीची जबाबदारी सोपवावी. कारण धवनने अलिकडच्या काळात भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली नाही. त्यामुळं धवनचे करिअर संपले की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

वाचा-टीम इंडिया T20 रँकिंगमध्ये घसरली, विराटने केला बचाव

‘केएल राहुलवर विश्वास ठेवणे आवश्यक’

माजी भारतीय सलामीवीर श्रीकांत यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या लेखात म्हणाले, “टी -20 वर्ल्ड कप सुरू होण्यास अद्याप 10 महिने बाकी आहेत. सलामीवीर म्हणून भारतीय संघाने केएल राहुलवर आत्मविश्वास राखला पाहिजे. शिखर धवनच्या पलीकडे आता विचार करण्याची गरज आहे. वेगळी सुरुवात ही काळाची मागणी आहे आणि या क्षेत्रात अलीकडेच भारत अपयशी ठरला आहे. डाव सांभाळण्यासाठी विराट कोहलीसह इतरही फलंदाज नक्कीच आहेत, पण गेल्या काही वर्षांत आयसीसी स्पर्धेत आपण पाहिल्याप्रमाणे, मोठ्या प्रसंगी ते फारसे सिद्ध झाले नाही”, असे मत व्यक्त केले आहे.

First published: December 6, 2019, 5:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading