IPL 2021: विराटच्या टीमनं सोडलेल्या ‘या’ खेळाडूवर तीन टीम लावणार बोली?

IPL 2021: विराटच्या टीमनं सोडलेल्या ‘या’ खेळाडूवर तीन टीम लावणार बोली?

आयपीएलच्या (IPL) 14 व्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव (Players Auction) 18 फेब्रुवारीला होणार आहे. यावर्षी होणाऱ्या लिलावात शिवम दुबेला (Shivam Dube) खरेदी करण्यासाठी चुरस रंगण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी: आयपीएलच्या (IPL) 14 व्या सीझनसाठी खेळाडूंचा लिलाव (Players Auction) 18 फेब्रुवारीला होणार आहे. यंदा मोठा लिलाव (Mega Auction)  होणार नाही. तरीही सर्वच टीम्सनी त्यांच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडूंना वगळलं आहे. त्या खेळाडूंचा यंदा पुन्हा एकदा लिलाव होईल. यावर्षी होणाऱ्या लिलावात शिवम दुबेला (Shivam Dube) खरेदी करण्यासाठी चुरस रंगण्याची शक्यता आहे.

शिवम यापूर्वी विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी (RCB) टीममध्ये होता. मुंबईच्या या तरुण खेळाडूला दोन वर्षांपूर्वी आरसीबीनं खरेदी केलं होतं. त्याला आता करारमुक्त करण्यात आलं आहे. आरसीबीनं सोडल्यानंतर शिवमनं चांगली कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) त्यानं मुंबईकडून सर्वात जास्त 161 रन केले होते. शिवमला खरेदी करण्यासाठी तीन आयपीएल टीममध्ये स्पर्धा लागण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-IND vs ENG: विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर अजिंक्य रहाणेनं दिलं मन जिंकणारं उत्तर!)

किंग्ज इलेव्हन पंजाबची (KIXP) आयपीएल स्पर्धेतील विजेतेपदाची पाटी अजूनही कोरीच आहे. पंजाबनं जिमी निशम आणि ग्लेन मॅक्सवेलला वगळलं आहे. त्यामुळे त्यांच्या टीममध्ये फिनिशरची जागा रिकामी आहे. शिवम दुबे या जागेचा प्रबळ दावेदार आहे. पंजाबच्या टीममध्ये लोअर ऑर्डरला तो चांगली भूमिका बजावू शकतो. त्याचबरोबर त्याची पार्ट टाईम बॉलिंग पंजाबसाठी उपयोगाची आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) समोर मागील स्पर्धेतील अपयश पुसण्याचं आव्हान आहे. धोनीच्या टीममध्ये ड्वेन ब्राव्हो, सॅम करन आणि मिचेल स्टॅनर हे ऑल राऊंडर आहेत. मात्र हे सर्व विदेशी ऑल राऊंडर आहेत. त्यामुळे शिवमचा टीममध्ये समावेश करुन चेन्नई भारतीय ऑल राऊंडरची कमतरता भरुन काढण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-...तर शुभमन गिलचं करियर धोक्यात, समोर आली मोठी चूक)

सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) लोअर ऑर्डरमध्ये प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद हे तीन पर्याय आहेत. पण यापैकी एकही बॉलिंग करण्यास सक्षम नाही. त्यामुळे शिवम  दुबे हैदराबादच्या टीमचा सदस्य झाला तर त्यांची टीम अधिक संतुलित होऊ शकते.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 1:03 PM IST

ताज्या बातम्या