IND vs ENG: विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर अजिंक्य रहाणेनं दिलं मन जिंकणारं उत्तर!

IND vs ENG: विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर अजिंक्य रहाणेनं दिलं मन जिंकणारं उत्तर!

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (IND vs AUS) टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला. या टेस्ट सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कॅप्टनसीनं सर्वांनाच प्रभावित केलं.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (IND vs AUS) टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवला. या टेस्ट सीरिजमध्ये अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कॅप्टनसीनं सर्वांनाच प्रभावित केलं. त्याची आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीची तुलनाही सुरु झाली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चार टेस्ट मॅचची सीरिज पाच फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या सीरिजमध्ये विराट कोहली हा भारतीय टीमचा (Team India) कर्णधार आहे. तर, अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल. ‘या नव्या भूमिकेमुळे काय बदल होईल?’ असा प्रश्न अजिंक्यला विचारण्यात आला होता.

अजिंक्यनं दिलं उत्तर

'काहीही बदल होणार नाही. विराट कोहली माझा कर्णधार होता आणि असेल. मी उपकर्णधार आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये मला कॅप्टनसी देण्यात आली होती. टीम इंडियाला यश मिळावं यासाठी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणे हे माझं काम होतं.' असं उत्तर अजिंक्यनं दिलं आहे.

(हे वाचा-IND vs AUS : आपण जिंकलो, म्हणत या महान परदेशी खेळाडूने मारली गावसकरांना मिठी)

अजिंक्य पुढे म्हणाला की, 'फक्त कॅप्टन होणं हे महत्त्वाचं नाही. तुम्ही कॅप्टनसीची जबाबदारी कशी पार पाडता हे जास्त महत्त्वाचे आहे. मी आजवर यामध्ये यशस्वी ठरलो आहे. भविष्यातही काही चांगले निर्णय देऊ शकेल, अशी मला आशा आहे.' अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनसीखाली भारतीय टीमनं आजपवर एकूण पाच टेस्ट खेळल्या आहेत. त्यापैकी चार टेस्ट जिंकल्या असून एक ड्रॉ केली आहे.

विराटशी संबंध कसे आहेत?

विराट कोहलीशी असलेल्या संभाषणावरही रहाणेनं सविस्तर उत्तर दिलं आहे. 'माझ्यात आणि विराटमध्ये चांगला समन्वय आहे. त्यानं वेळोवेळी माझी प्रशंसा केली आहे. आम्ही टीमसाठी भारतामध्ये आणि विदेशातही काही अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. तो चौथ्या नंबरवर तर मी पाचव्या नंबरवर बॅटिंग करतो. त्यामुळे आम्ही अनेक पार्टरनरशिप एकत्र केल्या आहेत. आम्ही कायम एकमेकांचा आदर करतो. एकत्र खेळताना नेहमी प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलिंगवर चर्चा करतो,' असं रहाणेनं स्पष्ट केलं.

(हे वाचा-IND vs AUS : या खेळाडूने दिली ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याची 'आयडिया'!)

विराटच्या कॅप्टनसीवर रहाणे म्हणाला, 'तो अतिशय हुशार कॅप्टन आहे. तो मैदानावर चांगले निर्णय घेतो. स्पिनर्सना बॉलिंग देण्याबाबत त्याचा माझ्या निर्णयावर विश्वास आहे. अश्विन आणि जडेजाच्या बॉलिंगवर मी स्लीपमध्ये चांगला कॅच पकडतो, असं त्याला वाटतं. विराटच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो.' असं उत्तर रहाणेनं दिलं आहे.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 9:33 AM IST

ताज्या बातम्या