IND vs ENG: इंग्लंड सीरिजसाठी तीन भारतीय खेळाडू चेन्नईत दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

IND vs ENG:  इंग्लंड सीरिजसाठी तीन भारतीय खेळाडू चेन्नईत दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

भारत -ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिजच्या यशस्वी सांगतेनंतर आता भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजचे वेध सर्वांना लागले आहेत.

  • Share this:

चेन्नई, 27 जानेवारी:  भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिजच्या यशस्वी सांगतेनंतर आता भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सीरिजचे वेध सर्वांना लागले आहेत. इंग्लंड विरुद्धची चार टेस्टची सीरिज पाच फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या सीरिजसाठी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane),  रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हे तीन खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. हे तिघंही थेट हॉटेलमध्ये रवाना झाले असून तिथं ते दोन्ही टीमच्या सदस्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘बायो बबल’मध्ये राहतील. कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि अन्य सदस्य बुधवारी चेन्नईत दाखल होणार आहेत, अशी माहिती भारतीय टीमच्या स्थानिक मीडिया अधिकाऱ्यानं दिली आहे.

इंग्लंडचे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि मोईन अली हे तीन खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहे. कॅप्टन जो रुट (Joe Root) सर अन्य इंग्लंड टीम बुधवारी श्रीलंकेतून चेन्नईमध्ये दाखल होईल. श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं पराभूत करुन मोठ्या आत्मविश्वासानं इंग्लंडची टीम चेन्नईत दाखल होणार आहे. दोन्ही टीमचे खेळाडू सहा दिवस बायो बबलमध्ये राहतील. ते दोन फेब्रुवारीवारीपासून सराव करु शकतात, अशी माहिती तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.

(हे वाचा-IND vs AUS : या खेळाडूने दिली ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याची 'आयडिया'!)

कोरोना महामारीच्या (Corona Pandemic ) नंतर भारतात होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सीरिज आहे. या सीरिजच्या अनुभवानंतरच इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा भारतात खेळवण्याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो. या स्पर्धेचा तेरावा सिझन कोरोना महामारीमुळे दुबईत झाला होता.

भारत-इंग्लंड सीरिजचं संपूर्ण वेळापत्रक

-टेस्ट सीरिज

5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी - पहिली टेस्ट- चेन्नई

13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी - दुसरी टेस्ट- चेन्नई

24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी - तिसरी टेस्ट (डे-नाईट)- अहमदाबाद

4 मार्च ते 8 मार्च - चौथी टेस्ट- अहमदाबाद

(हे वाचा-...तर शुभमन गिलचं करियर धोक्यात, समोर आली मोठी चूक)

-टी-20 सीरिज

12 मार्च- पहिली टी-20- अहमदाबाद

14 मार्च- दुसरी टी-20- अहमदाबाद

16 मार्च- तिसरी टी-20- अहमदाबाद

18 मार्च- चौथी टी-20- अहमदाबाद

20 मार्च- पाचवी टी-20- अहमदाबाद

-वनडे सीरिज

23 मार्च- पहिली वनडे- पुणे

26 मार्च- दुसरी वनडे- पुणे

28 मार्च- तिसरी वनडे- पुणे

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 9:47 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या