BCCI च्या पॉलिसीमुळे 17 जणांना घ्यावी लागणार निवृत्ती

BCCIला लिहलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, जर आम्हाला हे सांगितलं असतं की येणारा हंगाम आमचा शेवटचा आहे तर ते आम्ही सहज स्वीकारलं असतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : भारतात क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. बीसीसआय ही सर्वात श्रीमंत अशी संस्था आहे. आता बीसीसीआयने रिटायरमेंट पॉलिसीमध्ये केलेल्या बदलाने आता अनेकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये 17 स्कोरर्सवर निराशा ओढावली आहे. खरंतर क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूनंतर धावा आणि इतर सर्व डिटेल्स अपडेट करण्याचं काम हे स्कोरर्स करतात. पण आता बीसीसीआयच्या रिटायरमेंट पॉलिसीचा परिणाम या स्कोरर्सवर होणार आहे.

बीसीसीआयच्या नव्या रिटायरमेंट पॉलिसीनुसार यंदाच्या हंगामात 60 वर्षांच्या होणाऱ्या 17 स्कोरर्सना निवृत्ती घ्यावी लागण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने जरी याबाबत कोणती अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांना या हंगामात काम दिलं जाणार नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या स्कोरर्सनी बीसीसीआय़ अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्र लिहिलं आहे. जर आम्हाला हे सांगितलं असतं की येणारा हंगाम आमचा शेवटचा आहे तर ते आम्ही सहज स्वीकारलं असतं. आम्ही बीसीसीआयचे कर्मचारी नाही त्यामुळे रिटायर कसे होई शकतो. तसेच पंच, मॅच रेफरीप्रमाणे आम्हाला मॅच फी, पेन्शन यासारख्या सुविधाही मिळत नाही. आम्ही 50 रुपये प्रतिदिन इतक्या वेतनावर काम केलं आहे. काहींनी आपल्या सेंटरवर काम करायला मिळावं म्हणून प्रमोशनही नाकारलं.

एका स्कोररने सांगितलं की, जगातील कोणत्याही देशात स्कोरर्स म्हणून काम करण्यासाठी वयोमर्यादा नाही. इतकंच काय अनेक ठिकाणी लोक त्यांच्या प्रोफेशनल करिअरमधून रिटायर झाल्यानंतर स्कोरिंगला त्यांचं प्रोफेशन बनवतात. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपवेळी स्कोरर म्हणून काम केलेल्या एका व्यक्तीचं वय 70 वर्ष होतं.

पंचांप्रमाणे आम्हाला फिटनेस जोपर्यंत आमची नजर ठीक आहे तोपर्यंत आम्ही तंदुरुस्त आहे. 2014 पासून नवीन नियुक्ती नाही झालेली. सध्या कोणताही बॅकअप नसताना स्कोरर्सना रिटायर कसं करू शकता असा सवालही विचारण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BCCI
First Published: Dec 3, 2019 08:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading