• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • राजीव सातवांच्या मुलाला दहावीत 98.33 टक्के मार्क्स; सुप्रिया सुळेंनी भावनिक ट्विट करत म्हटलं, आज राजीव असते तर....

राजीव सातवांच्या मुलाला दहावीत 98.33 टक्के मार्क्स; सुप्रिया सुळेंनी भावनिक ट्विट करत म्हटलं, आज राजीव असते तर....

Rajiv Satav son Pushkaraj gets 98.33 per cent in class 10 exam: काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

 • Share this:
  पुणे, 25 जुलै: आयएससीई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल काल (24 जुलै 2021) जाहीर करण्यात आले. या परीक्षेत काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या मुलाने घवघवीत यश मिळवले आहे. राजीव सातव यांचा मुलगा पुष्कराज (Pushkaraj) याने दहावीच्या परीक्षेत 98.33 गुण (98.33 per cent in Class 10 exam) मिळवले आहेत. पुष्कराज याने मिळवलेल्या या यशामुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पुष्कराज याचं अभिनंदन करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक भावनिक ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं, राजीव सातव आज असते तर त्यांना आपल्या मुलाचं यश पाहून खूप आनंद झाला असता. राजीव आणि प्रज्ञा यांचा मुलगा पुष्कराज याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत (ICSE) 98.33 टक्के गुण मिळवले. या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन. पुष्कराज, खूप मोठा हो ! आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटतो. ICSE, ISC Result 2021: 10वी, 12वीचा निकाल जाहीर; निकालाची टक्केवारी बघून वाटेल आश्चर्य राजीव सातव यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. सुप्रिया सुळे यांनीही त्यावेळी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली होती. आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं, काँग्रेसचे खासदार आणि आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झालं. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दु:खद बातमी आहे. त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते.
  Published by:Sunil Desale
  First published: