पुणे जिल्ह्यातील बहिरवाडी गावात लसीकरण पूर्ण; 100 टक्के लसीकरण करणारं देशातील पहिलं गाव

Bahirwadi Pune district village 100 per cent vaccinated: पुणे जिल्ह्यातील बहिरवाडी गावातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

Bahirwadi Pune district village 100 per cent vaccinated: पुणे जिल्ह्यातील बहिरवाडी गावातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

  • Share this:
पुणे, 19 जून: राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला (Covid Vaccination program) वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण (Vaccination) लवकरात लवकर करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. या लसीकरण मोहिमेच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) पुरंदर तालुक्यातील (Purandar Tehsil) बहिरवाडी (Bahirwadi Village) येथील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे. शंभर टक्के लसीकरण पुर्ण झालेले बहिरवाडी हे देशातील पहिले गाव ठरले आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी दिली आहे. बहिरवाडी हे गाव दुर्गम असून स्थानिक ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या पुगावातील सर्व वयोगटातील व्यक्तींना पहिला डोस अर्थात कोरोनाची लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. कोरोनामुक्त असलेले हे गाव आता गावातील सर्व लाभार्थींना पहिला डोस मिळालेले गाव ठरले आहे. पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांची मोठी घोषणा बहिरवाडी हे गाव पूर्णतः दुर्गम असून येथे महादेव कोळी, मागास समाज बहुतांशी प्रमाणात आहे. यामध्ये केंद्राकडून 50 टक्के, राज्याकडून 25 टक्के आणि 25 टक्के स्वखर्चातून ही मोहीम राबविण्यात आली. पुणे येथील सिरम कंपनीतून कोवीशिल्ड लस घेण्यात आली होती घेण्यात आली आहे. विशेष अभियान राबवून सर्वाना पहिला डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले. यापूर्वी गावातील केवळ 27 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली होती. संपुर्ण गाव लसीकरणा पासून वंचित असल्याने ग्रामीण संस्थेच्या वतीने कोवीसील्ड लसीची खरेदी करून हा लसीकरण कार्यक्रम संपुर्ण गावासाठी राबविण्यात आला आहे. गावात 18 वर्षांपुढील 540 नागरिक असून या सर्वाना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस दिला आहे. त्याच प्रमाणे सहा महिन्याच्या पुढील जवळपास 150 पेक्षा जास्त बालकांना एनफ्ल्यूइंझाची लस देण्यात आली आहे.
Published by:Sunil Desale
First published: