लॉकडाऊन 5 मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेतले, गरीबांना वाऱ्यावर सोडले, नरेंद्र मोदींवर थेट आरोप

लॉकडाऊन 5 मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेतले, गरीबांना वाऱ्यावर सोडले, नरेंद्र मोदींवर थेट आरोप

गरीब कामगार प्रवास कसा करतील, याबाबत केंद्र आणि राज्य सरकार बोलायला तयार नाही.

  • Share this:

पुणे, 31 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 1 जून ते 30 जूनदरम्यान लॉकडाऊन 5 असेल. मात्र, या लॉकडाऊनमध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेण्यात आले. मात्र, गरीबांना वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे. त्यामुळे हे सरकार श्रीमंतांचे आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा... मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झालेल्या रकमेबाबत आश्चर्यकारक माहिती आली समोर

पाचवा लॉकडाऊन करताना काही नियम, अटी घालण्यात आल्या तर काही ठिकाणी नियमांना धरून लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. त्यात मॉल, हॉटेल तसेच काही कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, गरीब कामगार जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात ते कधी सुरु करणार, याबाबत काहीच खुलासा करण्यात आला नाही, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय कार्यालये चालू करणार पण गरीब कामगार प्रवास कसा करतील, याबाबत केंद्र आणि राज्य सरकार बोलायला तयार नाही. कोरोनाच्या काळातही हे सरकार श्रीमंतांची बाजू घेत आहे आणि गरिबांना वाऱ्यावर सोडत आहे, असे चित्र पाचव्या लॉकडाऊनमध्ये दिसत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा जाहीर मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

लॉकडाऊनसाठी काय आहेत महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्स?

-नाईट कर्फ्यू - रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी

-व्यायामासाठी खुल्या मैदानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. (सकाळी 5 ते सांयकाळी 7) मात्र गर्दी करण्यास बंदी

-5 जूनपासून काही भागातील दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी

-मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सना परवानगी नाही

-नियमांचं उल्लंघन केल्यास दुकाने बंद करणार

-वाहनांनाही परवानगी, मात्र प्रवासी संख्येला मर्यादा

-कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी दिली जाईल. या भागांमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाईल

-या झोनमध्ये येण्यास किंवा बाहेर जाण्यास परवानगी नाही

हेही वाचा.. 'नमस्ते ट्रम्प'मुळे देशात पसरला कोरोना, संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात

कन्टेन्मेंट झोनबाबत महापालिकांना अधिकार

दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड-19 चा संसर्ग टाऴण्यासाठी आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत असेल.

First published: May 31, 2020, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading