बँक अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी 'प्रामाणिक' पोलिस इन्स्पेक्टरनेच घेतली लाच

बँक अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी 'प्रामाणिक' पोलिस इन्स्पेक्टरनेच घेतली लाच

उच्चशिक्षित असलेले मिलन कुरकुटे याची अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड, 24 जानेवारी: बँकेतील अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी 'प्रामाणिक' आणि 'शिस्तप्रिय' अशी ख्याती असलेल्या पोलिस उपनिरिक्षकाला लाच स्वीकारताना प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. मिलन कुरकुटे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी मिलन कुरकुटे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. सांगवी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिलन कुरकूटे यांनी त्यांचेकडील तपासावरील गुन्हा 376/13 कलम 406, 420,34 भादंविमध्ये तपासात बँकेतील अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. पहिला हप्ता 25 हजार रुपये स्वीकारताना मिलन कुरकूटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. सदरचे घटनास्थळ हे पोलीस स्टेशन सांगवी हद्दीत येत असल्याने गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सुरू आहे.

दरम्यान, उच्चशिक्षित असलेले मिलन कुरकुटे याची अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. मात्र, आज त्यांच्यावर झालेल्या कारवाई पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एसीबीचे एक पथक कुरकुटे ह्यांच्या घराची झडती घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यात मुकादमाच्या घरी सापडलं घबाड

दरम्यान, गेल्या आठवड्या पुण्यात अशीच एक घटना घडली होता. फुटपाथवरच्या नारळ विक्रेत्याकडून पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या मुकादमाच्या घरी तब्बल 36 लाख रुपयांचं घबाड सापडल्याने पुण्यात खळबळ उडाली होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे पाचशे रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या मुरादमाच्या घरी छापा टाकला होता. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम सुनील शर्मा आणि मदतनीस गोपी उबाळे या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्रभर नोटा मोजत बसले पथक

या कारवाईत एसीबीच्या तपास पथकाला तब्बल 36 लाख रूपयांची रोकड आणि आठ तोळे सोन्याचे दागिने सापडले आहेत. मुकादमाच्या घरी एवढी मोठी रक्कम पाहून एसीबीचे अधिकारीही थक्क झाले. शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरू होती. पथकातील अधिकारी नोटा मोजत बसले होते.

सुनील शर्मा हा पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम पदावर कार्यरत आहे. तर उबाळे हा त्याची बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी मुकादमाने पाचशे रुपयांची लाच घेतली होती. एसीबीने या प्रकरणी दखल घेऊन शर्मा याच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने आढळून आले. पाचशे रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुकादमाकडे मोठी रोकड मिळेल, असा अंदाज एसीबीच्या तपासपथकालाही नव्हता. त्यामुळे या पथकाला रात्र जागून काढावी लागली. याठिकाणी 36 लाख रुपयांची रोकड आणि 7 तोळ्यांचे दागिने मिळाले. दागिने आणि रोकड जप्त करून ते येरवडा पोलिस ठाण्यात पहाटे जमा करण्यात आले आहेत. दरम्यान रोकड आणि दागिने मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका मुकादमाच्या घरी इतकी रोकड सापडल्याने पोलिसही आवक झाले आहेत. शर्मा याची दोन लग्नं झाली असून एक पत्नी 10 बाय 10 च्या खोलीत राहते तर दुसरी लाडकी पत्नी बंगल्यात राहते. याच बंगल्यात पोलिसांना ही रक्कम पोत्यात भरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 09:34 PM IST

ताज्या बातम्या