पिंपरी चिंचवड: मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड: मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यू

ढिगाऱ्या खाली अडकेल्यांना वाचवताना रविवारी एका अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला होता.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी, 02 डिसेंबर: दापोडीत ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या कर्मचाऱ्याला काढण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. खड्ड्यात अडकलेल्या कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला असल्याचं समजत आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेमागे ठेकेदाराचा हलगर्जीपणा असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती नेमल्याची माहितीही त्यांनी दिली.

दापोडीमधील पाण्याच्या टाकीजवळ ड्रेनेजसाठी खड्डा खोदण्याचं काम सुरू होतं. हे काम करणारा एक कर्मचारी खोल खड्ड्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून आणखी एक मोठा खड्डा खोदण्यात आला. अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड अग्निशामन दलाचा जवान  शहीद झाला, तर एक कामगार ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आला आहे.

वाचा-महाविकास आघाडीत पेच! ठाकरे सरकारमध्ये मंत्र्यांनी शपथ तर घेतली पण...

अग्निशमन दलाचे दोन अधिकारी खड्ड्यात उतरून कर्मचाऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठ्या खड्ड्याची माती तिघांच्या अंगावर पडून कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे तीन जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. त्यांना वाचविण्यासाठी आणखी काही जवान मदत कार्यात उतरले होते. त्यापैकी एका अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. तर एक मजुराचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला आहे.

विशाल जाधव यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर खड्ड्यात अडकलेल्या नागेश जामादार या मजुराचाही मृत्यू झाला आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 08:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading