Elec-widget

खड्ड्यात पडलेल्या सहकाऱ्यांना वाचविताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

खड्ड्यात पडलेल्या सहकाऱ्यांना वाचविताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

गेल्या 6 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे. आत्तापर्यंत 4 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय.

  • Share this:

गोविंद वाकडे, पिंपरी, 01 डिसेंबर : पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या दापोडीत ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला काढण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाचे 2 जण जवानही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या तिघांना वाचविण्यासाठी आणखी तीन जवान त्या खड्ड्यात उतरले होते. त्यातल्या एका जवानाचा मृत्यू झालाय. विशाल जाधव असं त्या जवानाचं नाव आहे. प्रथमदर्शनी हा ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून येतोय त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणार असल्याचं आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितलंय. घटनेच्या चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती नेमल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा फडणवीसांचा प्रयत्न केली 'ही' मागणी

गेल्या 6 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे. आत्तापर्यंत 4 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, दापोडीमधील पाण्याच्या टाकीजवळ ड्रेनेजसाठी खड्डा खोदण्याचं काम सुरू आहे. हे काम करणारा एक कर्मचारी खोल खड्ड्यात पडल्याने खळबळ उडाली. त्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाकडून आणखी एक मोठा खड्डा खोदण्यात आला.

पंकजा मुंडे भाजप सोडणार का? त्यांच्या विश्वासू आमदाराने केला मोठा खुलासा

अग्निशमन दलाचे दोन अधिकारी खड्ड्यात उतरून कर्मचाऱ्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठ्या खड्ड्याची माती तिघांच्या अंगावर पडून कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे तीन जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. त्यांना वाचविण्यासाठी आणखी काही जवान मदत कार्यात उतरले आहेत. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी अग्रिशमन दल आणि पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2019 11:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...