पहिली बेटी धनाची पेटी.. या कुटुंबाने केले मुलीचे अनोखे स्वागत

पहिली बेटी धनाची पेटी.. या कुटुंबाने केले मुलीचे अनोखे स्वागत

पहिली बेटी धनाची पेटी..असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते.

  • Share this:

रायचंद शिंदे,(प्रतिनिधी)

शिरूर,4 डिसेंबर: पहिली बेटी धनाची पेटी..असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते. मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. दुसरीकडे हैदराबाद, कोपर्डी येथे घडणाऱ्या घटना अंगावर काटा आणतात. मात्र, शिरुर तालुक्यातील पाबळ येथील कोल्हे कुटुंबाने फुलाच्या पायघड्या टाकत मुलीचे स्वागत केल्याने सर्वत्र या दाम्पत्याचे कौतुक होत आहे.

मुलगी ही परक्याचे धन असते म्हणून 'मुलगी नको' अशी मानसिकता बहुतांश दाम्पत्यांची झाली आहे. मात्र, कोल्हे दाम्पत्याने मुलीचे अनोखे स्वगत केले आहे. मुलीच्या रूपाने घरात लक्ष्मी आली, असे म्हणून तिचा गौरव केला आहे. एवढेच नाही तर कोल्हे दाम्पत्याने मुलीच्या नावावर एक लाख रुपयांची धनराशी ठेऊन त्यातून मिळणाऱ्या व्याजातून गोरगरीबांच्या मुलीकरता शैक्षणिक खर्च करण्याचा संकल्प कोल्हे दाम्पत्याने केला आहे. या दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव 'लक्ष्मी' असे ठेवले आहे.

शिरूर तालुक्यातील पाबळ येथील ऋषिकेश कोल्हे व त्यांची पत्नी प्रतिक्षा कोल्हे यांना लग्नानंतर पहिली मुलगी झाली. प्रतिक्षा कोल्हे यांनी आपल्या माहेरी पंचवीस सप्टेंबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर दोन महिन्यानंतर प्रतिक्षा कोल्हे या आपल्या सासरी म्हणजे पाबळ येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची मुलगी "शिवन्या" यांना पाबळ येथे आईचे व लेकीचे घरामध्ये प्रवेश करताना दोघीनाही औक्षण करत ओवाळून फुलाच्या पायघड्या टाकत फुलाच्या वर्षावात मध्ये स्वागत केले. सर्वसामान्य कोल्हे कुटुंबीयांनी या मायलेकींचे केलेले स्वागत म्हणजे समाजापुढे एक आदर्श आहे. खऱ्या अर्थाने मातृशक्तीचा झालेला सन्मान हा विकृत मानसिकतेला चपराकच म्हणावी लागेल.

Published by: Sandip Parolekar
First published: December 4, 2019, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading