CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत, पण...

CM उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच वेळी केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत, पण...

भेटीनंतर मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईकडे तर फडणवीस हे नागपूरला रवाना झाले. या भेटीत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांचं नेमकं काय बोलणं होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

  • Share this:

पुणे 06 डिसेंबर :  पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांचं आज पुण्यात आगमन झालं. राजशिष्टाचारानुसार मुख्यंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर हजर होते. विधानसभेचा प्रचार संपल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती. त्यांनी पंतप्रधानांचं स्वागत करत हस्तांदोलन केलं.  याच वेळी माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीसही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच रांगेत पंतप्रधानांच्या स्वागताला उभे होते. पण दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही अशी माहिती समोर येतेय. ही भेट फक्त 10 मिनिटं चालली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईकडे तर फडणवीस हे नागपूरला रवाना झाले. या भेटीत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांचं नेमकं काय बोलणं होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. याआधी अमित शहा हे पुण्यात दाखल झाले होते. ही फक्त भेट झाली पण त्यांचं मोकळं बोलणं झालं नाही अशीही माहिती आहे.

राज्यातील पूरग्रस्तांसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!

हे दोनही दिग्गज नेते पोलिसांच्या एका परिषदेसाठी पुण्यात येत असून त्यांचा दोन दिवस शहरात मुक्काम असणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

देशातल्या सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांची परिषद दरवर्षी होत असते. त्या बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहतात. 2014 पर्यंत ही बैठक दिल्लीत होत असे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये दरवर्षी दिल्ली बाहेर ही परिषद घेण्याचा पायंडा मोदींना पाडला. त्यानुसारच ही परिषद यावर्षी पुण्यात होत आहेत.

शिवसेनेकडेच राहणार 'हे' सगळ्यात महत्त्वाचं खातं, अजित पवारांना बसू शकतो धक्का!

देशभरातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा, राज्य स्तरावर पोलीस दलांमध्ये करायचे आवश्यक बदल, पोलीस आणि गुप्तचर संस्थांमध समन्वय वाढवणं असे अनेक विषय या बैठकीत चर्चेला येणार आहेत. यंदा ही बैठक पुण्यात 7 ते 8 डिसेंबर अशी होणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय.

या परिषदेला सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक, गुप्तचर संस्थांचे प्रमुख, ज्येष्ठ पोलीस अधिकारी, गृहमंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उप सुरक्षा सल्लागार दत्ता पडसलगीकर हेही या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 6, 2019, 10:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading