पुण्यात प्रतिष्ठित नागरिकांच्या फोटोवर जादूटोणा, टोचले लिंबू, काळी बाहुली अन् बिब्बा

पुण्यात प्रतिष्ठित नागरिकांच्या फोटोवर जादूटोणा, टोचले लिंबू, काळी बाहुली अन् बिब्बा

  • Share this:

अनिस शेख,(प्रतिनिधी)

मावळ,5 डिसेंबर: लोणावळा तुंग गावातील इसार शाळेजवळ असलेल्या एका झाडावर मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित नऊ जणांचे फोटो चिकटऊन त्यावर जादूटोणा अर्थात भानामतीचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. जादूटोणा करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या प्रसिद्ध उद्योगपती तसेच तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, अशोकाच्या एका झाडाला मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित नऊ नागरिक पांडुरंग कृष्णा जांभुळकर, संदीप एकनाथ पठारे, किसन बंडु ठोंबरे, योगेश घाडगे, संजय कोकरे, संतोष हघारे, कश्वर शेख, अजय मेहता आणि मनोज सेनानी यांचे फोटो खिळ्याने ठोकले आहेत. फोटोवर लिंबु, काळ्या बाहुल्या, बिबा टाचण्या लाऊन भानामतीसारखा अघोरी प्रकार करण्यात आला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत झाडाला लावलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटोवरील लिंबू, टाचण्या, बाहुल्या काढून टाकल्या आहेत. या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांना संबंधित व्यक्तींनी तक्रार केली आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. निर्जनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असा खोडसाळपणा करणारा सूत्रधार कोण आहे, हे शोधण्याचे आव्हान लोणावळा ग्रामीण पोलिसांसमोर आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 5, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading