LG K42: एलजीच्या या स्मार्टफोनवर विशेष सूट, एक नव्हे तर इतक्या वर्षांची मिळेल वॉरंटी
LG K42: ज्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोनमध्ये फक्त एक वर्षाची वॉरंटी उपलब्ध असते. पण LG k42 सोबत दोन वर्षांची वॉरंटी मिळत आहे. याव्यतिरिक्त, इतर वैशिष्ट्ये देखील आहेत.


एलजी इंडियाने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन मॉडेल आणला आहे. एलजीने LG K42 स्मार्टफोन नुकताच बाजारात आणला आहे. या फोनची किंमत 10,990 रुपये आहे. दोन वर्षाची वॉरंटी, एक वेळ स्क्रीन बदलण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. (image: LG India)


LG K42 स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर आज 26 जानेवारीपासून सुरू होईल. LG k42 मध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले, रिकॉर्ड कॅमेरा सेटअप, 3 डी साऊंड इंजिन, AI technology आणि 4,000 MAH बॅटरी देण्यात आली आहे. (image: LG India)


या स्मार्टफोनसह Mil-Std 810G ची टिकाऊपणाची चाचणी उत्तीर्ण करण्याबरोबरच कंपनीने असा दावा केला आहे की उच्च तापमान, निम्न तापमान, शॉक, कंपन, अशा विविध श्रेणींमध्ये US Military Standard चाचण्यांद्वारे ते प्रमाणित झाले आहेत. (image: LG India)


LG k 42 मध्ये 6.6 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे. रॅम 3 जीबी आहे, तर अंतर्गत स्टोरेज 64 जीबी आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ पी 22 प्रोसेसरसह कार्य करतो. (image: LG India)


LG k42 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 13 एमपी प्रायमरी सेन्सर, 5 एमपी सुपर-वाइड लेन्स, 2 एमपी डेप्थ कॅमेरा आणि 2 एमपी मॅक्रो शूटर आहेत. सेल्फीज आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8 एमपी कॅमेरा आहे. (image: LG India)


LG K42 मध्ये 4,000 MAH बॅटरी क्षमता आहे. तसेच हा Android 10 ऑपरेटिंग सिस्टमसह कार्य करतो. यात ड्युअल सिमची सुविधा देखील देण्यात आली आहे. (image: LG India)


ग्रीन आणि ग्रे रंगांमध्ये LG K 42 स्मार्टफोन तुम्ही केवळ 10,990 रुपयात खरेदी करू शकता. (image: LG India)


बाजारात 12,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बरेच स्मार्टफोन आहेत. शाओमी, रियलमी, सॅमसंग, ओप्पो यासारख्या ब्रँडचे स्मार्टफोन आहेत. LG k42 हा आता रेडमी नोट 9, रेडमी नोट 9 प्रो, सॅमसंग गॅलेक्सी एम 21, पोको एम 2 प्रो, मोटो जी 9, मोटो जी 9 पॉवर, ओप्पो ए 33, ओप्पो ए 15 या स्मार्टफोनसह स्पर्धा करेल. (image: LG India)