बुमराहसोबत नाव जोडलं गेलेली संजना गणेशन कोण आहे? जाणून घ्या पुणे कनेक्शन
टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah Marriage) लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराहने याच कारणासाठी चौथ्या टेस्टमधून माघार घेतली.


टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराहने याच कारणासाठी चौथ्या टेस्टमधून माघार घेतली. याच आठवड्यात बुमराह गोव्यात लग्न करणार असल्याचं बोललं जातंय, पण ही मुलगी कोण आहे, याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत बुमराह लग्नगाठ बांधेल, अशा चर्चा आहेत. तर काही ठिकाणी स्पोर्ट्स एँकरशीही बुमराहचं नाव जोडलं जात आहे.


संजना गणेशन याच्यासोबत याआधीही जसप्रीत बुमराहचं नाव जोडलं गेलं होतं. संजना आयसीसी वर्ल्ड कप 2019 पासून आयपीएलपर्यंतच्या स्पर्धांमध्ये एँकर होती. आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमसाठीही तिने एँकरिंग केलं.


संजनाने पुण्याच्या प्रसिद्ध विद्यापीठातून इंजिनियरिंगची डिग्री घेतली आहे. यानंतर काही काळ ती मॉडेलिंग क्षेत्रात होती. तसंच 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलमध्ये पोहोचली.


संजनाने 2013 साली फेमिना गॉर्जियसचा किताब जिंकला. एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून तिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं.