

कर्नाटकमध्ये भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांचं सरकार अवघ्या 55 तासांमध्ये कोसळलं होतं. भाजपला बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं अखेर त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. कर्नाटक विधानसभा निवडणुकांनंतर सर्वात कमी दिवस मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा विक्रम येडियुरप्पांनी मोडला होता.


उत्तर प्रदेशच्या जगदंबिका पाल यांनीही 1998 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी राज्यपालांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. कोर्टाचा निर्णयामुळे जगदंबिका पाल यांना तीन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


सतिश प्रसाद सिंह यांना अवघ्या 5 दिवसांमध्ये आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 5 दिवस कार्यभार सांभाळला होता.


झारखंडच्या राज्यपालांनी शिबू सोरेन यांना 2005 रोजी अल्पमत असतानाही सरकार स्थापन करण्याचा आदेश दिला होता. बहुमताचा आकडा गाठू न शल्यानं त्यांना 12 मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिली.


देवेंद्र फडणवीस सरकारकडे बहुमत नसल्यामुळे 78 तासांमध्ये कोसळलं आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे फडणवीस सरकार कोसळलं आहे.


मेघालयामध्ये एस. सी. मारक यांच्या नावाचा सर्वात कमी काळ मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्यांमध्ये समावेश आहे. 27 फेब्रुवारी ते 3 मार्च 1998 रोजी अवघे 6 दिवस त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.