
स्तनपान करणाऱ्या महिलांनी आहारात फ्लॅक्स सीड्स, दही, अंडी, ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. प्रथिने तसेच पुरेसे जीवनसत्व, कॅल्शियम, व्हिटामिन डी, लोह, फॉलिक अॅसिड हे महत्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आहारात समावेश असावा तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.