
अजूनही तरुण पिढीला नव्वदच्या दशकातील अनेक गाणी पसंत पडतात. हिना, आशिकी, सिर्फ तुम यांसारख्या चित्रपटांची गाणी आजसुद्धा सुपरहिट आहेत. या काळात याचित्रपटांसोबत या अभिनेत्रीसुद्धा खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र आज त्या माध्यमांपासून दूर राहत अज्ञातवासात आपलं आयुष्य जगत आहेत. 90च्या काळातील अनेक अभिनेते आजही चित्रपटात काम करत आहेत. मात्र अभिनेत्री फारच कमी प्रमाणात दिसून येत आहेत.

90 च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट 'आशिकी' मधून आपल्या अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल. या चित्रपटात तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र एका घटनेने अनूचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. ती हळूहळू चित्रपटसृष्टीपासून अलिप्त होतं गेली. त्यातून ती कधीच बाहेर निघू शकली नाही. तिने आपल्या एका पुस्तकात आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहिलं होतं.