'तारक मेहता...'मधील दया बेनपासून माधवी भाभीपर्यंत... अभिनेत्रींचे रिअल लाइफ Husband
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील रील लाइफ जोड्यांना तर आपण रोजच बघतो. पण या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रींनी खऱ्या आयुष्यात कोणाशी लग्नगाठ बांधली आहे? पाहा PHOTO


तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील कलाकारांच्या रील लाइफ जोड्या तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. पण इतकी वर्ष आपलं मनोरंजन करणाऱ्या तारक मेहतामधील अभिनेत्रींच्या रीअल लाईफ जोड्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मालिकेत माधवी भाभीचं काम करणाऱ्या अभिनेत्रीपासून ते रिटा रिपोर्टरपर्यंत सर्व अभिनेत्रींनी खऱ्या आयुष्यात कोणाशी लग्न केलं आहे?


गोकुळधाम सोसयटीमधील एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे यांच्या पत्नीचं काम करणाऱ्या माधवी भाभीचं खरं नाव सोनालिका जोशी आहे.


सोनालिका जोशी यांच्या पतीचं नाव समीर जोशी आहे. सोनालिका नेहमीच आपल्या पतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.


प्रिया आहुजाने मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा यांच्याशीच लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.


डॉक्टर हाथी आणि कोमल हाथी ही रील लाइफ जोडी तर आपण सर्वांनीच पाहिली आहे. मालिकेत कोमलची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव अंबिका रांजणकर आहे.


अंबिका रांजणकर यांच्या खऱ्या पतीचं नाव अरुण रांजणकर आहे. अरुण स्वत: एक उत्तम दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. त्यांच्या मुलाचं नाव अथर्व आहे.


जेनिफरच्या पतीचं नाव बॉबी बंसीवाल आहे. तोदेखील कलाकार आहे. जेनिफर सोशल मीडियावर फार सक्रीय असते.


तारक मेहतामध्ये बबीताची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे फार प्रसिद्ध आहे. या मालिकेत मुनमुन कृष्णन अय्यरच्या पत्नीचं काम करते.


दया बेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सर्वात जास्त हिट आहे. खरंतर प्रेग्नसीसाठी सुट्टीवर गेलेली दिशा अजूनही मालिकेत परतली नाही. ती पुन्हा येणार ? की तिच्या जागी दुसरी अभिनेत्री काम करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.


सुनैना फौजदारने तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये उशिरा एन्ट्री घेऊनसुद्धा तिला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत ती अंजली भाभीची रिप्लेसमेंट म्हणून आली आहे.