श्रुती हसनचा नवा अंदाज; Bold Photos पाहून चाहते घायाळ
नुकताच न्यूज वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये श्रुती कोरोना महामारीमध्ये मालदीवला सुट्टीला जाणाऱ्या कलाकारांवर भडकली होती.
|
1/ 10
दक्षिण आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन आपल्या अभिनय आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
2/ 10
श्रुती सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
3/ 10
आजचं श्रुतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. खुपचं वेगळ्या अंदाजातील या फोटोमध्ये श्रुती एकदम बोल्ड दिसत आहे.
4/ 10
श्रुती प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता कमल हसन आणि ज्येष्ठ अभिनेत्री सारिका यांची मुलगी आहे.
5/ 10
नुकताच न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रुती कोरोना महामारीमध्ये मालदीवला सुट्टीला जाणाऱ्या कलाकारांवर भडकली होती.
6/ 10
श्रुतीने म्हटलं होतं देशाला अशा कठीण काळात सोडून बाहेर जाऊन मास्क काढून स्विमिंगपूल मधील आपले फोटो पोस्ट करत आपले विशेष्याधिकार दाखविणे चुकीचे आहे. अशा कलाकारांना श्रुतीने असंवेदनशील म्हटलं आहे.
7/ 10
सध्या रणबीर कपूर, आलिया भट्ट, सारा अली खान, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, जान्हवी कपूर यांसारखे कलाकार मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.
8/ 10
लवकरच श्रुती विजय सेतुपती यांच्या 'लाबम' या चित्रपटात दिसून येणार आहे. मात्र या चित्रपटाचे सर्व कामकाज थांबवण्यात आलं आहे. कारण नुकताच दिग्दर्शक एस.पी.जननाथन याचं निधन झालं आहे.
9/ 10
त्याचबरोबर श्रुती सुपरस्टार प्रभाससोबत 'सलार' या चित्रपटात काम करणार आहे. यामध्ये श्रुती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
10/ 10
नुकताच श्रुती तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपली वडिलांसाठी प्रचार करताना दिसून आली होती. यामध्ये बहिण अक्षरा सुद्धा होती. कोयम्बतूर मधून कमल हसन यांनी ही निवडणूक लढवली आहे. याचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहे.