

संपूर्ण देशात गाजलेलं सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरण अद्याप संपलेलं नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


सुशांत ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. (NCB to file 30000 page chargesheet) (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर CBI द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु होती. दरम्यान ड्रग्जचं प्रकरण समोर आलं. तेव्हापासून एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


लक्षवेधी बाब म्हणजे या 30 हजार पानांच्या आरोपपत्रांमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या भावासह आणकी ३३ जणांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


या 33 जणांमध्ये श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान यांनी दिलेल्या स्टेटमेंटची देखील नोंद करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


या ड्रग्ज रॅकेटमध्ये बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकार सामिल असल्याचा संशय NCBनं व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


या प्रकरणाचा तपास करत असताना एनसीबीनं काही ड्रग्ज पेडलर्स आणि इतरांनाही अटक केली होती. त्यांचीही नावं यात आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)


14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. त्यानंतर एम्स रुग्णालयाकडून सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)