Happy B'day Jitendra : फक्त 100 रुपये मानधनावर सुरुवात; बॉलिवूडच्या 'जम्पिंग जॅक'चा खडतर प्रवास
बॉलीवूड मधील जम्पिंग जॅक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. जितेंद्र आज आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पाहूया त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी.


बॉलिवूडमधील जम्पिंग जॅक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. जितेंद्र आज आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पाहूया त्यांच्या बद्दल काही खास गोष्टी.


जितेंद्र यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर इथं झाला. त्यांचं मूळ नाव रवी कपूर असं होतं. मात्र चित्रपटसृष्टीत आल्यावर त्यांना जितेंद्र हे नाव मिळालं.


व्ही शांताराम यांनीच जितेंद्र यांना अभिनयाची पहिली संधी दिली होती. 'गीत गाया पत्थरो ने' हा त्यांचा पहिला चित्रपट होता.


गीत गाया पत्थरों ने' या चित्रपटावेळी जितेंद्र यांनी संवाद बोलण्यासाठी तब्बल 30 वेळा रिटेक घेतला होता. मात्र तरीसुद्धा त्यांची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती.


शोभा कपूर या जितेंद्र यांच्या पत्नी आहेत. तर या दोघांना एकता कपूर आणि तुषार कपूर ही दोन अपत्ये आहेत.


सुरुवातीच्या काळात जितेंद्र एका छोट्याशा चाळीत राहत होते. त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटात महिना 100 रुपये इतक्या मानधनावर काम केलं आहे.


जितेंद्र यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या नृत्याची सुद्धा वाहवाह होतं असे. पडद्यावर अभिनेत्री श्रीदेवी आणि जया प्रदा या दोघींबरोबर त्यांची खास जोडी जमत होती.