मध्यप्रदेशातील गाव पाहून अनुपम खेर भारावले; 'Happy Birthday' निमित्त दिली भेट
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी आपल्या 'Happy Birthday' या लघुपटाचं चित्रीकरण केलं आहे. याबद्दल बोलतना त्यांनी म्हटलं आहे.चित्रीकरणानिमित्त त्यांनी मध्यप्रदेश मधील रायसेन जिल्ह्यातील इमालीया गोंडी या गावला भेट दिली.


ज्येष्ठ अभिनेता अनुपम खैर यांनी आपल्या 'Happy Birthday' या लघुपटाचं चित्रीकरण केलं आहे. याबद्दल बोलतना त्यांनी म्हटलं आहे.चित्रीकरणानिमित्त त्यांनी मध्यप्रदेश मधील रायसेन जिल्ह्यातील इमालीया गोंडी या गावला भेट दिली. आणि येथील नागरिकांशी नरेंद्र मोदी यांच्या घरकुल योजनेबद्दल माहिती घेतली. त्या लोकांना याचा फायदा झाला आहे. तेथील स्वच्छता पाहून माझे डोळे उघडल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.


हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे. भारतातील ग्रामीण भागातील वातावरण अजूनही स्वच्छ आणि सुंदर आहे. अशा ठिकाणी चित्रीकरण करायला छान वाटतं. तसेच या साध्या सरळ लोकांना भेटून आपले डोळे पूर्णपणे उघडतात.


अनुपम खैर यांनी घरकुल योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या एका घराचा फोटो पोस्ट केला आहे. आणि तेथे राहणाऱ्या रचना या छोट्या मुलीशी संवाद साधला आहे. तिच्या म्हणण्यानुसार 2018-19 मध्ये त्यांना या घराचा लाभ झाला आहे.


रचनासोबत संवादाचा एक व्हिडीओ अनुपम खैर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आणि त्यासोबत असं लिहिलं आहे. रचना सोबत बोलून छान वाटलं. आणि गोष्ट समजली पंतप्रधान योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या घरकुल योजनेचा लोकांना फायदा होतं आहे. चित्रिकरणानिमित्ताने भोपाळपासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावाला भेट दिली आहे.