प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी
मुंबई, 02 डिसेंबर : एकट्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी राज्यात ऐतिहासिक सत्ता पालट झाला. ज्यांचं पारडं सगळ्यात जड होतं अशा भाजपला विरोधा पक्षात बसण्याची वेळ आली तर वेगवेगळ्या विचारांच्या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. लोकसभा आणि विधानसेभेआधी राज्यात भाजप फॉर्ममध्ये होता. यंदाही भाजपचेच सरकार येणार असा विश्वास सगळ्यांना होता. त्यामुळे सत्तेसाठी आणि तिकीटासाठी अनेक बड्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
पण विधानसभेच्या निकालानंतर मात्र वेगळंच राजकीय नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. मुख्यमंत्री पदावरून युतीत ठिणगी पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नव्या नात्याला उभारी आली. त्यांच्यात ऋणानुबंध इतके चांगले झाले की त्यांनी एकत्र घरोबा केला आणि सत्ता स्थापन केली. पण अशात आता 'घर फिरले की घराचे वासेही फिरतात' अशी गत भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची झाली आहे. सत्ता होती म्हणून भाजपमध्ये गेले खरे पण आता सत्तेचे वासे फिरल्यामुळे पुन्हा काही नेत्यांची घरावापसी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
इतर बातम्या - ...तर हैदराबाद प्रकरणात ना बलात्कार झाला असता ना हत्या, धक्कादायक माहिती समोर
महाआघाडीने विधानसभेमध्ये बहुमत सिध्द केलं. त्यामुळे ऐन निवडणूक पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या आमदारांची चलबिचल सुरू झाली आहे. यातील अनेक आमदारांनी परत यावं अशी भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादीमधूनदेखील उमटू लागली आहे. त्यामुळे भविष्यात अंदाजे 15 आमदारांची घरवापसीची करण्याची तयारी सुरू होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा मानणारे पण सध्या भाजपात असलेले अनेक नेते आता परत घरी येतील अशी शक्यता आहे.
हे आमदार करू शकतात घरवापसी
- प्रशाम्त ठाकूर
- राविशेठ पाटील
- राणा जगजीत
- नामदेव सासणे
- शिवेंद्र राजे भोसले
इतर बातम्या - पंकजा मुंडे शिवसेनेते प्रवेश करणार का? संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
- संजय सावकारे
- गणेश नाईक
- विजय कुमार गावित
- राजेश पाडवी
- कांशीराम पावरा
- मोनिका राजळे
- राधाकृष्ण विखे पाटील
मोठी बातमी - देवेंद्र फडणवीसांना धक्का, आणखी एका आमदाराने सोडली साथ
एकीकडे आता सत्तेत आल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग होईल अशा चर्चा आहेत. त्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजपला रामराम करून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण, पंकजा मुंडे यांनी सगळ्यात आधी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर पंकजांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल करत त्यातील 'BJP' हा शब्द काढला. यानंतर पंकजांनी व्हॉट्सअॅपवर त्यांचा मोदींसोबत डीपीदेखील बदलला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे. पंकजा मुंडे खरंच शिवसेनेत जाणार का असे तर्क आता लावले जात आहेत.
इतर बातम्या - रोहित पवारांचं एक असंही रूप, फेसबुक पोस्टने केलं सगळ्यांना भावूक...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा