'या' जागेवर महाविकास आघाडीचा संसार मोडणार, काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने

'या' जागेवर महाविकास आघाडीचा संसार मोडणार, काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने

भाजपने सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी संसार सुरू झाला असला तरी भिवंडी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फुट पाहायला मिळते.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी,  30 नोव्हेंबर : विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केलं आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केलं. तर 4 आमदार तटस्थ राहिल्याचं पाहायला मिळालं. भाजपने सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी संसार सुरू झाला असला तरी भिवंडी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फुट पाहायला मिळते.

निजामपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि कॉग्रेस पक्षच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांच्या गटात उभी फूट पडल्याचे उघड झाले आहे. तर कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास आर.पाटील यांनी त्यांच्या पत्नी असलेल्या माजी महापौर प्रतिभा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे.

काँग्रेस पक्ष आणि भाजप नगरसेवकांचा एक मोठा गट प्रतिभा पाटील यांच्या सोबत असल्याने काँग्रेस पक्षाच्या गटात भीतीचे वातावरण पसरले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौर पदासाठी चार उमेदवारांनी एकूण 7 तर उपमहापौर पदासाठी सात जणांनी 9 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भिवंडी शहर महानगरपालिकेत शिवसेना, काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत 90 नगरसेवक असून त्यामध्ये काँग्रेसचे 47, शिवसेना 12, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 9, समाजवादी पार्टीचे 2 असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेत काँग्रेस-शिवसेना आघाडीची सत्ता आहे. सध्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी तर उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज काटेकर सत्तास्थानी आहेत.

महापौर व उपमहापौर यांच्या पदाची मुदत 9 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे या निवडणूकीसाठी शासन निर्देशानुसार महापौरपदासाठी येत्या 5 डिसेंबर रोजी पालिका सभागृहात निवडणूक होणार आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी 3 ते 5 वेळेदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती.

महापौर पदासाठी आलेले अर्ज

काँग्रेस पक्षातून

- वैशाली मनोज म्हात्रे (अर्ज -1  ),

- रसिका प्रदीप राका (अर्ज - 2)

कोणार्क विकास आघाडी पक्षातून

- प्रतिभा विलास पाटील (अर्ज - 2) ,

शिवसेना पक्षातून

- वंदना मनोज काटेकर (अर्ज -2 )

उपमहापौर पदासाठी आलेले अर्ज

काँग्रेस पक्षातून

- इमरान वली मोहम्मद खान (अर्ज -2 ),

- राबिया मकबूल हसन (अर्ज -1) ,

- तलाह मोमीन  (अर्ज -1) ,

- मुख्तार मो.अली खान (अर्ज -1) ,

शिवसेना पक्षातून

- बाळाराम चौधरी  (अर्ज -2),

- मदन ( बुवा ) नाईक  (अर्ज -1) ,

- संजय म्हात्रे  (अर्ज - 1) यांनी आपले उमेदवारी अर्ज नगरसचिव अनिल प्रधान यांच्याकडे दाखल केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 08:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading