भारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी! लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO पहा

भारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी! लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO पहा

भारतीय रेल्वेने बॅटरीवर चालणारे इंजिन तयार केले असून त्याची यशस्वी चाचणीही केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करुन एक व्हिडीओ शेअर केला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 9 जुलै : गेल्या तीन महिन्यांमध्ये भारतीय रेल्वेने बर्‍याच नवीन गोष्टी सुरू केल्या आहेत. क्लीन फ्युलच्या वापरात रेल्वेने  आणखी वाढ केली आहे.

भारतीय रेल्वेने बॅटरीवर चालणारे इंजिन तयार केले असून त्याची यशस्वी चाचणीही केली आहे. तर आता हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की आता काही दिवसातच बॅटरीवर धावणारी रेल्वे दिसू शकतात.

वीज व डिझेलचा वापर वाचविण्यासाठी उचललं हे पाऊल

रेल्वेच्या म्हणण्यानुसार हे इंजिन वीज आणि डिझेलचा वापर वाचविण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या जबलपूर विभागात एक बॅटरीने चालणारे ड्युअल-मोड शंटिंग लोको 'नवदूत' तयार करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे, ज्याची चाचणी यशस्वी झाली आहे. डिझेल वाचविण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ही बॅटरीवर चालणारी लोको एक मोठे पाऊल असेल.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट केले की ही बॅटरीवर चालणारी  लोको हे उज्ज्वल भविष्याचे लक्षण आहे, जे डिझेलद्वारे परकीय चलन वाचविण्यास आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठे पाऊल ठरेल.

शेषनाग काही काळापूर्वी रुळावर धावला

गेल्या आठवड्यात रेल्वेने 2.8 किमी लांबीची मालवाहतूक रेल्वे रुळांवर करून इतिहास रचला. रेल्वेने या ट्रेनचे नाव शेषनाग ठेवले. या ट्रेनमध्ये चार इंजिन बसविण्यात आले होते. 251 वॅगन घेऊन ट्रेन धावली. यापूर्वी, रेल्वेने 2 किमी लांबीचे सुपर अ‍ॅनाकोंडा चालवले, ज्यात 6000 हॉर्स पावरची क्षमता असणारी 3 इंजिन स्थापित केली गेली. या ट्रेनमध्ये 177 लोडेड वॅगन होते.

 

 

Published by: Meenal Gangurde
First published: July 9, 2020, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading