सलग दुसऱ्या दिवशी महाग झालं सोनं-चांदी, एका क्लिकमध्ये पाहा सोन्याचे नवे दर

सलग दुसऱ्या दिवशी महाग झालं सोनं-चांदी, एका क्लिकमध्ये पाहा सोन्याचे नवे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या छोट्याशा तेजीमुळे सोनं आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोनं महाग झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,  14 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या छोट्याशा तेजीमुळे सोनं आणि चांदीच्या किंमतीत  (Gold-Silver Rate Today)वाढ झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोनं महाग झालं आहे.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 14th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 70 रुपये प्रतितोळा वाढ झालीय. या वाढीनंतर सोन्याचे नवे दर 41 हजार 481 रुपये प्रतितोळा झालेत.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 14th February 2020)

चांदीच्या किंमतीत 147 रुपये प्रतिकिलोने वाढ झालीय. चांदीचे नवे दर  47 हजार 36 रुपये झालेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,575.80 डॉलर प्रति औंस आणि चांदीचे भाव 17.69 डॉलर प्रतिऔंस झाले.

रुपया कमकुवत झाल्याने वाढले भाव

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये तेजी आलीय. डॉलरच्या तुलनेत रुपया खाली येऊन 71. 33 वर आला आहे. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय बाजारात फारसा फरक नसल्याने सोनं - चांदीच्या किंमतीत फारशी वाढ झालेली नाही.

सोनं घेताना घ्या खबरदारी

सोनं घेताना ज्वेलर्सनी लावलेल्या किंमतींवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. कारण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचा किंमतींवर परिणाम होतो. सोन्याची किंमत, घडणावळ, रत्नांचं मूल्य हे सगळं यात येतं. देशभरात सोन्याच्या किंमती ठरवण्यासाठी एकच परिमाण नाही. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे वेगवेगळे भाव असतात. प्रत्येक शहरात सराफांची संघटना एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवते. त्यामुळे या दरांमध्ये फरक पडतो.

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Feb 14, 2020 05:44 PM IST

ताज्या बातम्या